Goa Congress demands resignation of minister Milind Naik over irregularities in selection process in power department
Goa Congress demands resignation of minister Milind Naik over irregularities in selection process in power department 
गोवा

गोवा काँग्रेसकडून वीज खात्यात निवड प्रक्रियेवेळी झालेल्या गैरप्रकारप्रकरणी मिलिंद नाईकांच्या राजीनाम्याची मागणी

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी :  वीज खात्यात पाच वर्षापूर्वी सहाय्यक डेटा एन्ट्री ऑपरेटर्सची (एडीईओ) निवड प्रक्रियेवेळी झालेल्या गैरप्रकारप्रकरणी काँग्रेसतर्फे तक्रार दाखल करण्यात येणार असून त्यामध्ये गुंतलेल्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली जाणार असल्‍याची माहिती काँग्रेसचे कायदा कक्षाचे प्रवक्ते ॲड. कार्लोस फेरेरा यांनी दिली. नोकरभरती प्रक्रियेत होत असलेला गैरप्रकार या निवाड्यातून स्पष्ट झाला आहे. 


वीज खात्यात काही राजकारण्यांनी आपल्या मर्जीतील उमेदवारांची निवड व्हावी, यासाठी नोकरभरती प्रक्रिया सुरू असताना नियमच बदलले होते. त्यामुळे पात्र उमेदवारांवर अन्याय झाला होता. या खंडपीठाच्या निवाड्यामुळे गैरप्रकारे निवड होऊन सेवेत घेतलेल्या काही कर्मचाऱ्यांवर घरी जाण्याची पाळी आली आहे. या एकूण प्रकरणाला तत्कालिन वीजमंत्री तसेच निवड प्रक्रिया घेणारे अधिकारी जबाबदार आहेत. काहींनी सरकारी नोकरीसाठी निवड झाल्याने खासगी नोकऱ्या सोडून सेवेत रूजू झाले. त्यांनी गेली पाच वर्षे सेवेत आहेत व अचानक त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहेत. त्यांची या नोकरभरतीच्या प्रक्रियेत काहीच चूक नसताना नियम बदल करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे त्यांना नोकऱ्या गमावण्याची पाळी आहे. त्यामुळे हा गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई होण्याची गरज असल्याने ही तक्रार दाखल करण्यात येत असल्‍याची माहिती ॲड. फरेरा यांनी दिली. 

राजीनाम्‍याची मागणी

वीज नोकरभरती प्रक्रियेला माजी वीजमंत्री हे जबाबदार असल्याने त्यांनी स्वतःहून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी तो न दिल्यास त्यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकावे. मुरगाव बंदरातही कथित चोरी प्रकरणात त्याचा सहभाग आहे. त्यामुळे मिलिंद नाईक हे मंत्रिमंडळासाठी अयोग्‍य आहेत. त्यांच्याविरुद्ध आणखी तीन घोटाळे आहेत, त्‍यांचा पुढील आठवड्यात पर्दाफाश केला जाईल असा इशारा म्हार्दोळकर यांनी दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT