CM Pramod Sawant
CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Drugs Case: मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना आदेश, 'कोणाचीही गय करु नका, पूर्णपणे मुक्तहस्ताने...''

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant समाजात सध्या विविध प्रकारे गोंधळ माजविण्याचा प्रकार वाढत आहे. ड्रग्स त्यातीलच एक घटक असून त्‍याविरोधात डिचोली पोलिस स्थानकाने हाती घेतलेली मोहीम योग्यच आहे. ड्रग्सव्‍यवसायात गुंतलेल्‍या कोणाचीही सरकार गय करणार नाही.

कारवाईसाठी पोलिसांना पूर्णपणे मुक्तहस्त देण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी नगरपालिकेत पत्रकारांशी बोलताना दिली.

डिचोली पोलिसांनी ड्रग्सविरोधात सुरू केलेल्या मोहिमेत आतापर्यंत ११ जणांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अटक केली होती. यापैकी ७ जण साखळी व परिसरतील असल्याने तेथे अंमलीपदार्थांचा व्यवहार होत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

ही बाब धक्कादायक तितकीच चिंताजनकही आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत करून ही मोहीम अशीच सुरू ठेवण्‍याची सूचना आपण केली आहे, असे काब्राल यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक यशवंत माडकर, दयानंद बोर्येकर, व्यापारी अनिल काणेकर, नंदकुमार आपटे आणि मान्‍यवरांची उपस्‍थिती होती.

पोलिसांनी काही युवकांना ताब्यात घेतले आहे. त्‍यांनी ड्रग्‍स व्‍यवसायात पडून आपले जीवन बरबाद करू नये. तसेच पालकांनीही आपल्‍या मुलांकडे लक्ष ठेवावे. मुलगा ड्रग्सच्या आहारी गेला असल्यास त्याला व्यसनमुक्ती केंद्रात भरती करावे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED ची गोव्यात मोठी कारवाई! चौगुले उद्योग समूहाच्या सात ठिकाणांवर छापे, कागदपत्रे जप्त

Gallantry Awards: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शूरवीरांना किर्ती अन् शौर्य चक्र प्रदान

Goa: आई स्वयंपाकात व्यस्त असताना चिमुकलीचा वीज तारेशी संपर्क आला, झारखंडच्या मजुर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

Panjim News: अग्निशमनच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना गोव्यात प्रशिक्षण

Harvalem Caves And Waterfall: इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुहा नक्की पाहा

SCROLL FOR NEXT