Sports University in Goa | CM Pramod Sawant
Sports University in Goa | CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Sports University in Goa : गोव्यात लवकरच सुरू होणार क्रीडा विद्यापीठ; मुख्यमंंत्र्यांची मोठी घोषणा

सुशांत कुंकळयेकर

Sports University in Goa : गोव्यात खऱ्या अर्थाने क्रीडा प्रसार व्हावा आणि क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी गोव्यात लवकरात क्रीडा विद्यापीठ सुरू केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. 'दैनिक गोमन्तक'चे प्रतिनिधी मंगेश बोरकर यांच्या 'खेळांगण' आणि 'फुटबॉलच्या भूमीत' या दोन पुस्तकांचे प्रकाशन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमाला मडगावचे आमदार दिगंबर कामत, माजी खासदार नरेंद्र सावईकर तसेच गोमंत कला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष लोटलीकर उपस्थित होते.

गोव्यात उच्च दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असेल. खेळाडूंना चांगले प्रशिक्षण मिळाले यासाठीही तरतूद केली जाणार आहे. गोव्यात लवकरच अत्याधुनिक असे हॉकीचे मैदान उभे होत आहे. या साऱ्या सुविधांचा खेळाडूंनी लाभ घ्यावा आणि क्रीडा क्षेत्रात राज्याचा दर्जा वाढवावा असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं आहे. यावेळी लेखक बोरकर यांचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.

दरम्यान खेळाडूंनी राज्यातील सुविधांचा सर्वात चांगला उपयोग करून खेळाचा दर्जा वाढवण्याची गरज दिगंबर कामत यांनी व्यक्त केली. आज क्रीडा क्षेत्र हे पूर्वीसारखे राहिलेले नसून आता या क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी खेळाडूने परिश्रम घेण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी बोरकर यांच्या पत्रकारितेचे कौतुक करताना त्यांनी आपल्या लेखणीतून उत्तेजन दिल्याने आज कित्येक खेळाडू पुढे आले आहेत, असे म्हटले आहे. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेत्या भक्ती कुलकर्णी यांच्यासह ब्रह्मानंद शंखवाळकर, अनुरा प्रभुदेसाई आणि युतीका सत्तरकर या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

दोन्ही पुस्तकावर ज्येष्ठ पत्रकार वामन प्रभू यांनी भाष्य करताना 'फुटबॉलच्या भूमीत' हे पुस्तक गोव्यातील फुटबॉल खेळाचा मागच्या 99 वर्षांच्या इतिहासाचा एक दस्तावेज म्हणावा लागेल असं सांगितलं. खेळातील आपली आवड हीच क्रीडा पत्रकारिता सुरू करण्याचे कारण ठरले आणि मागच्या तीस वर्षात आपल्याला जे अनुभव आले ते या दोन्ही पुस्तकातून पुढे आले आहेत असं पुस्तकाचे लेखक मंगेश बोरकर यांनी सांगितलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT