पर्यटकांची मौजमजा संसर्गास ठरेल कारण
पर्यटकांची मौजमजा संसर्गास ठरेल कारण 
गोवा

पर्यटकांची मौजमजा संसर्गास ठरेल कारण?

प्रतिनिधी

पणजी:  कोरोनासंदर्भात मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी सरकारने मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा आदेश काढला होता. पोलिस व संबंधित क्षेत्रातील पंचायतींना ही कारवाई करण्याचे अधिकार दिला होता. मात्र त्यांच्याकडूनही कोणतीच कारवाई केली जात नाही. सध्या समुद्र खवळलेला आहे त्यामुळे जीवरक्षक या पर्यटकांना समुद्रात न जाण्याच्या सूचना करत असतानाही त्याला किंमत देत नाही. गेल्या सहा महिन्यापासून गोव्यात येण्यासाठी उत्सुक असलेल्या या पर्यटकांनी जीवाची मौजमजा करताना कोरोना महामारी अजूनही अस्तित्वात आहे व त्याचा संसर्ग होऊ शकतो, याचे भान ठेवलेले नाही. राज्यातील प्रशासन व कारवाई करणारी यंत्रणा सुस्त बनली आहे. 
 
समुद्रकिनारी असलेली खाद्यपदार्थ, रेडिमेड कपड्यांची तसेच पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये हे पर्यटक जातात. हे पर्यटक कोरोनामुक्त आहेत की नाही, याची काहीच माहिती नसते. ते तोंडाला मास्क न लावताच फिरतात, मात्र कारवाई केली जात नाही. त्या परिसरात असलेले पर्यटन पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेत असताना दिसतात. या पर्यटकांना धाक दाखविला जात नसल्याने त्यांचे आयतेच फावले आहे. त्याचा फटका गोव्यातील कोरोना महामारी संसर्गावर बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

राज्य सरकार कोरोना महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असताना पर्यटकांची होणारी गर्दी तसेच त्यांच्याकडून मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. या पर्यटकांविरुद्ध कठोर कारवाई केली जात नसल्याने समुद्रकिनारी भागातील स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT