Goa BJP state president Sadanand Shet Tanawade covid positive
Goa BJP state president Sadanand Shet Tanawade covid positive Dainik Gomantak
गोवा

Goa BJP प्रदेशाध्यक्षांना कोरोनाची बाधा, संपर्कात आलेल्यांची उडाली तारांबळ

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Goa BJP state president Sadanand Shet Tanawade) यांना हलकासा ताप आल्यानंतर त्यांना गोमेकॉत (GMC) दाखल करण्यात आले आहे. काल संध्याकाळी हलकासा ताप आल्यानंतर ते गोमेकॉत दाखल झाले. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून ते कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19 Positive) झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तारांबळ उडाली आहे.

कोरोनामुळे रविवारी चौघांचा मृत्यू!

राज्यात काल चार कोरोनाबाधितांचे निधन झाले. गेले अनेक दिवस शून्य व काही दिवस एक किंवा दोन असेच कोरोना बळी जात होते. काल हा आकडा चार झाला. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, काल 4,852 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

जाहीर अहवालानुसार काल 74 नवे कोरोनाबाधित सापडले, तर 98 कोरोनाबाधित बरे झाले. कालच्या चार कोरोनाबाधितांच्या मृत्युमुळे आत्तापर्यंत कोरोनामुळे निधन झालेल्यांची संख्या 3,303 झाली आहे. राज्यात आजपर्यंत 18,47,806 एवढे लसीकरण झाले आहे. यात 11,95,970 लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस, तर 6,51,836 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. काल 11,670 एवढे लसीकरण झाले. त्यात 1,614 जणांनी पहिला, तर 10,056 जणांनी दुसरा डोस घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

SCROLL FOR NEXT