Mayem Program  Dainik Gomantak
गोवा

Mayem Biodiversity Map: मयेचा समग्र इतिहास दर्शवणारा माहितीपट अखेर सर्वांसमोर..

सीएम सावंत यांच्या हस्ते ‘जैवविविधता नकाशा’चे अनावरण

गोमन्तक डिजिटल टीम

Mayem Biodiversity मये गावातील समग्र इतिहास दर्शविणारा ‘जैवविविधता नकाशा’ तयार करण्यात आला असून या नकाशाचे आज म्हणजेच दि. 16 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या नकाशाद्वारे इसवी सन तेराशेपासूनचा मये गावचा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी वारसा माहिती स्वरूपात सर्वांसमोर येणार आहे.

आज या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे अनावरण मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले असून या विविधतेचे जतन, संरक्षण करण्यात मयेच्या जुन्या पिढीचा मोलाचा वाटा आहे. 12 व्या शतकापासूनचा इतिहास जतन करणारं मये हे देशातील पहिले गाव असून ही परंपरा आता येथील तरुणपिढी पुढे नेणार असल्याचे सावंत याप्रसंगी म्हणाले.

या कार्यक्रमासंबंधी शनिवारी सायंकाळी डिचोलीत घेतलेल्या या पत्रकार परिषदेवेळी मये-वायंगिणीच्या सरपंच सौ. सुवर्णा चोडणकर, उपसरपंच सुफला चोपडेकर, पंच सदस्य वर्षा गडेकर, विद्याधर कारबोटकर तसेच गोशाळेचे अध्यक्ष कमलाकांत यांनी माहिती दिली होती

इसवी सन तेराशेपासूनचा मये गावचा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी वारसा याबद्दल माहिती संकलित करून ती या नकाशात समाविष्ट करण्यात आली असून सोबतच जैवविविधता संपत्तीचाही अंतर्भाव या नकाशात करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Punjab Flood: पूरग्रस्त भागाची पाहणी करताना पंजाब मंत्र्यांच्या 'गोवा' ट्रीपबाबत गप्पा; व्हिडिओ व्हायरल, विरोधकांची टीका

हत्तीने प्रलंयकारी होऊन नासधूस करू नये, म्हणून गजमुखी देवतेची पूजा प्रचलित झाली असावी; गणपतीपूजनाची गोमंतकीय प्रथा

Goa Live Updates: विजय सरदेसाई यांनी दारू तस्करीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले

Ganesh Chaturthi: ऑर्केस्ट्रा, जादूचे प्रयोग, लॉटरी यांचे स्थान 'गणेशोत्सव' होऊच शकत नाही

SOPO Tax: दक्षिण गोव्यातील 'सोपो' प्रकरणात घोटाळ्याची शक्यता! निविदा जारी करण्यास विलंब; SGPDAचे आर्थिक नुकसान

SCROLL FOR NEXT