Club Tao Demolition Dainik Gomantak
गोवा

Club Tao Demolition: बागा-कळंगुट येथील ताओ डान्स बार 'जमीनदोस्त'; मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणविरोधातील मोहीम सख्त झाली आहे.

Manish Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणविरोधातील मोहीम सख्त झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज ( 5 ऑगस्ट) बागा येथील क्लब ताओ या डान्स बारवर कारवाई करण्यात आली. अतिक्रमण हटाव पथकाने या डान्स बारची तीन मजली इमारत पाडली. जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, कळंगुट (Calangute) पंचायतीकडून बागा येथील क्लब ताओविरुद्ध बांधकाम हटवण्याची नोटीस जारी करण्यात आली होती. यास ताओ तथा गजानन हॉस्पिलिटीच्या मालकांनी पंचायत संचालनालयाकडे आव्हान दिले होते. त्यानंतर संचालनायलयाने कळंगुट पंचायतीचा आदेश मान्य करत या क्लबच्या मालकांकडून दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली होती.

दुसरीकडे, पंचायत संचालनालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध क्लबच्या मालकांनी उत्तर गोवा जिल्हा दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळत अतिक्रमण हटवण्याचा आदेश दिला. न्यायालयाच्या (Court) या आदेशाच्या आधारे आज बार्देश गटविकास अधिकारी कार्यालयाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात या क्लबचे बांधकाम पाडण्यास सुरुवात केली.

गटविकास अधिकारी प्रथमेश शंकरदास यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मामलेदार कार्यालयाचे पथकही उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळ 'Haunted' म्हणणाऱ्या ब्लॉगरला जामीन; न्यायालयाने पोलिसांनाच फटकारले

Canacona: पर्यटन व्यवसायातील कामगारांचे हित जपणार, काणकोणात मंत्री तवडकरांची ग्वाही

Valpoi Road Issue: होंडा येथील रस्त्यांची दुरवस्था, गावकरवाडा ते पोलिस स्टेशनपर्यंत दैना; नवरात्रीपूर्वी डागडुजी करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Live News: वेर्णा येथे एक रुग्णवाहिका, कार, महिंद्रा आणि एक ट्रक यांच्यात अपघात

Goa Crime: फार्म हाउसमधील रोख, दुचाकी घेऊन काढला होता पळ, 6 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT