Goa Assembly Monsoon Session 2024 Live Update Day 4 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2024: गोवा माईल्सवरुन गोंधळ; आरोग्य विभागाबाबत आमदारांच्या मागण्या, मंत्री राणे, मुख्यमंत्र्यांनी काय दिले उत्तर?

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: आरोग्य विभागाबाबत प्रश्नोत्तराचा तास, दाबोळीबाबत लक्षवेळी चौथ्या दिवशीच्या कामकाजाकडे लक्ष.

Pramod Yadav

टाटा मेमोरियलचे काम दोन वर्षात होणार

टाटा मेमोरियल कर्करोग रुग्णालय पुढील दोन वर्षात सुरु होणार. काही परवान्यांसाठी उशीर होत असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

मानसोपचार रुग्णालयाचे नाव बदलण्यात येणार

मानसोपचार रुग्णालयाचे नाव बदलण्यात येणार आहे. 108 रुग्णवाहिकांची संख्या वाढण्यासोबत गोमॅकोत पेट स्केन मशीनला मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

आरोग्यविषय इमारतींच्या साधनसुविधांची कामे लवकर होणार!

आरोग्यविषय इमारतींच्या साधनसुविधांची कामे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून लवकरात लवकर होणार. यामुळे आरोग्य खात्यासाठीच्या अर्थसंकल्पीय निधीत घट होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

गोव्याबाहेर गेलेल्या गोवेकर डॉक्टरांना आम्ही ON BOARD घेतोय!

गोव्यात डॉक्टरांची कमतरता आहे. आम्ही आता गोव्याबाहेर गेलेल्या अनुभवी गोवेकर डॉक्टरांना ON BOARD घेतोय. मंत्री विश्वजीत राणेंचे प्रतिपादन.

चिंता नको! दक्षिण गोव्यात प्रत्येक घरापर्यंत आरोग्यसेवा देऊ, मंत्री राणेंच्या उत्तराला सुरुवात

दक्षिण गोव्याच्या लोकांनी आणि आमदारांनी चिंता करू नये. दक्षिणेतल्या लोकांच्या घरापर्यंत आरोग्यसेवा पोहचवू. काही गोष्टींसाठी वेळ लागतो. पण जे करू ते दर्जात्मकच असेल. विधानसभेत आरोग्य खात्याच्या मागण्यांवर मंत्री विश्वजीत राणेंचे प्रतिपादन.

दिवाडी बेटावर रुग्णालयाची फळदेसाईंची मागणी!

कुंभारजुवा मतदारसंघातील दिवाडी बेटावरील लोकांना फक्त फेरीबोटीचाच पर्याय. फेरीत बिघाड झाल्यास वा अती पावसात ती बंद असलेल्या वेळी लोकांची मोठी गैरसोय‌. याच कारणास्ताव दिवाडी बेटावर २० खाटांचे रूग्णालय आवश्यक. आमदार राजेश फळदेसाईंची विधानसभेत मागणी.

विजय सरदेसाई यांच्या मागण्या

- फोंडा तालुक्यात ४ आमदार असून सगळ्यांकडे मंत्रीपदे ही आहे तरीही फोंडा उपजिल्हा रूग्णालय कोमात आहे. फोंड्याला लवकरात लवकर उपजिल्हा रूग्णालयाची गरज आहे अशी मागणी विजय सरदेसाई यांनी केली

- PHC, CHC चे Audit करा, सरदेसाईंची मागणी

आमदार वीरेश बोरकर यांच्या मागण्या

- सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणखी एका Causality विभागाची मागणी केली आहे.

- स्वच्छतागृहांची मोडतोड करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी

- जीएमसीत पार्किंग सुविधा करण्याची मागणी

- गोवा वेल्हा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र अत्यंत गरज आहे. आरोग्य खात्याकडे जमीन ही उपलब्ध आहे. या जागेत प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर व्हावे.

मुरगावसाठी संकल्प आमोणकराच्या मागण्या

संकल्प आमोणकरांनी मुरगावसाठी एक Cardiac Ambulance ची मागणी केली आहे.

लाडली लक्ष्मी आणि गृह आधारसाठी तिजोरी खाली; युरी आलेमाव

"गृह आधार लाभार्थ्यांची प्रलंबित थकबाकी 9.05 कोटी आहे जी गेल्या 50 महिन्यांपासून प्रलंबित आहे. लाडली लक्ष्मी लाभार्थ्यांची थकबाकी 59 कोटी आहे जी गेल्या 60 महिन्यांपासून प्रलंबित आहे," असे आलेमाव म्हणाले.

फलोत्पादन मंडळाला मिळतात 20 कोटी - मुख्यमंत्री

राज्यातील लोकांना स्वस्त दरात भाजी उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकार दरवर्षी 20 करोड रुपये फलोत्पादन मंडळाला देते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची शुन्य प्रहरात सभागृहात माहिती

...तर दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासकाला निलंबित करा - मुख्यमंत्री

विरोधकांनी सांगितल्याप्रमाणे दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासकाबद्दल खुप तक्रारी आहेत. त्याची चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास लगेच निलंबित करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.

गोवा माईल्सच्या विषयावरुन आमदार प्रवीण आर्लेकर पडले एकाकी

मोपा विमानतळावरील गोवा माईल्सच्या विषयावरुन पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर आमदार पडले सभागृहात पडले एकाकी. मुख्यमंत्र्यांचीही मिळाली मंत्री माविनना साथ‌.

मंत्री माविन गुदिन्होंची गोवा माईल्ससाठी जोरदार बॅटींग!

गोवा माईल्समुळे बेहिशोबी टॅक्सी व्यवसायाला बसला वचक. गोवा माईल्समुळे सरकारला ५ कोटींचा महसूल. ॲपला विरोध करणाऱ्या स्थानिक टॅक्सीवाल्यांमुळे सुमारे १०० कोटींचा महसूल बुडाला. मंत्री माविन गुदिन्होंचे विधानसभेत प्रतिपादन.

Goa Assembly Session: अधिवेशन संपण्यापूर्वी प्रलंबित लाडली लक्ष्मीच्या अर्जांना मंजुरी!

चालू विधानसभा अधिवेशन संपण्यापूर्वी लाडली लक्ष्मीच्या प्रलंबित अर्जांना देणार मंजूरी. मंत्री विश्वजीत राणेंची विधानसभेत ग्वाही.

भटक्या कुत्र्यांची समस्या! सरकारला आपल्याच धोरणाचा विसर

उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सरकारने 6 जुलै 2023 रोजी भटक्या कुत्र्यांसाठी धोरण जाहीर केले होते. पण काल ओघाओघाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भटक्या कुत्र्यांसाठी नवे धोरण जाहीर केले होते.

अगोदरच एक धोरण असतना दुसरे धोरण कशासाठी, असा प्रश्न विचारत फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारची चूक दाखवून दिली.

Goa Medical College मध्ये लवकरच PET Scan मशीन!

कर्करोगाचे निदान लवकर होण्यासाठी आवश्यक असलेले PET Scan मशीन लवकरच जीएमसीत बसवणार आहोत. मंत्रीमंडळाने त्यासाठीची मान्यता दिलेली आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमावांना उत्तर देताना आरोग्य मंत्री विश्वजीत राणेंची माहिती.

Watch Goa Assembly Monsoon Session 2024 Live Here

Dabolim Airport: आणखी एका विमान कंपनीचा दाबोळी अलविदा, विरोधी पक्षनेत्यांची आज लक्षवेधी

दक्षिण गोव्याती दाबोळी विमानतळाला आणखी एका विमान कंपनीने अलविदा केला असून, त्यांनी देखील त्यांचे कामकाज मोपा विमानतळावर स्थलांतरीत केले आहे. दाबोळीच्या बाबतीत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज चोथ्या दिवशी लक्षवेधी मांडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yuri Alemao: 'राज्य सरकार बहुजनविरोधी, 2027 निवडणुकीत भाजपचा होणार दारूण पराभव'; LOP आलेमाव यांचा घणाघात

Goa Politics: खरी कुजबुज; जनता दरबारात खोडा घालण्‍यासाठी रॅली?

Shirgao: बळीराजा संकटात! शिरगावात भातशेती पाण्याखाली; पावसाच्या तडाख्याने रोपे मातीमोल

Goa Live News Updates: मांद्रे मधलामाज पुलाजवळ मागच्या तीन दिवसापासून जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

Vitthal Temple Goa: विठ्ठलापुरात भरला भक्तांचा मेळा! पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी; CM सावंतांकडून श्रींच्या मूर्तीवर अभिषेक

SCROLL FOR NEXT