Ravi Naik on African Cashew in Goa: Dainik Gomantak
गोवा

Ravi Naik: आफ्रिकन काजूची गोव्यात विक्री; 'राज्याची बदनामी रोखा', कृषिमंत्र्यांचे संबंधीत विभागाला आदेश

गोमन्तक डिजिटल टीम

Ravi Naik on African Cashew in Goa: आफ्रिकेतून काजू आणून गोव्यात विक्री केला जातो. त्यामुळे गोव्याचे नाव बदनाम होत असून याबाबत तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय गोव्याची फेणी आरोग्यासाठी चांगली असल्याची माहिती कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली.

दोनापावला येथील राजभवनच्या नवीन दरबार हॉलमध्ये कृषी खात्याच्या वतीने भरडधान्य 2023 उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री नाईक बोलत होते. कृषी संचालक नेव्हिल अल्फोन्सो, साहाय्यक कृषी अधिकारी दीपक गाडेकर उपस्थित होते.

मंत्री नाईक म्हणाले, गोव्यातील शेतकऱ्यांनी शेतात उतरण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी शेती कसणे बंद केल्यास शेतजमीन रिअल इस्टेट गुंतवणूकदारांना आकर्षित करेल आणि नजीकच्या भविष्यात आमची शेते काँक्रिटच्या जंगलात बदलू शकतात.

शेती लोकांना स्वावलंबनाकडे नेते म्हणून तरुणांनी त्यांच्या जमिनीत सर्व प्रकारची पिके घ्यावी, असे ते म्हणाले. यावेळी नीति आयोगाचे वरिष्ठ सल्लागार आणि नोडल अधिकारी डॉ. अण्णा रॉय यांनीही मनोगत व्यक्त केले.

आगामी विश्‍व महिलांचे भरडधान्य लागवडीला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कृषी संचालनालयाच्या अनेक योजना आहेत, ज्यात शेतकऱ्यांना जमीन लागवडीखाली आणण्यासाठी अनुदान आणि इतर साहाय्य दिले जाते.

ग्रामीण भागातील महिलांमध्ये उद्योजकता कौशल्ये वाढविणे महत्त्वाचे असून महिलांनी उत्पादनांची गुणवत्ता, मानके, मूल्यवर्धन, पॅकिंग आणि डिजिटल मार्केटिंगवर गांभीर्याने लक्ष केंद्रित केल्यास आगामी भविष्यात महिलांना उद्योजकतेकडे नेऊ शकेल, नाईक म्हणाले.

भरडधान्य पाककला स्पर्धा यावेळी भरडधान्य उत्पादनांवर आधारित पाककला स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये 70 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. शिवाय विविध बचत गटांनी भरडधान्य उत्सवात या धान्यावर आधारित खाद्यपदार्थांचे प्रदर्शन मांडले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT