Four wheelers fined Rs 800 in No Parking in Goa
Four wheelers fined Rs 800 in No Parking in Goa 
गोवा

गोव्यातील नो पार्किंग’मधील वाहनांना लागणार ‘व्हिल क्लॅम्‍प’

दैनिक गोमन्तक

पणजी: राजधानी असलेल्या पणजीत संध्याकाळी कसिनो कार्यालयासमोर तसेच इतर आजुबाजूच्या भागात बेशिस्तपणे वाहने पार्क केल्‍यामुळे वाहतूक कोंडी होते. त्यावर तोडगा म्हणून पणजी महापालिकेने चारचाकी वाहनांना ‘व्हिल क्लॅम्‍प’ लावून १०० रुपये दंडाऐवजी तो आता ८०० रुपये करण्याचा निर्णय पालिका मंडळाने घेतल्‍याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली. त्यामुळे बेशिस्त चारचाकी वाहन चालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. 


पणजीतील कसिनो खुले झाल्यापासून मोठ्या प्रमाणात त्यांच्या कार्यालयासमोर तसेच आजुबाजूच्या परिसरात दुचाकी व चारचाकी वाहन याच्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पणजी महापालिकेने या भागात ‘नो पार्किंग’चे फलक लावून कारवाईस सुरवात केली आहे. गेल्या आठवडाभरात २३० दुचाकी तर ३६० चारचाकी वाहनांविरुद्ध कारवाई केली आहे. नो पार्किंगमध्ये उभी केलेली वाहने उचलून ती महापालिकेच्या वाहनातून नेण्यात येत असून त्यासाठी ५०० रुपये दंड आकारण्यात येत आहेत.

तर त्या बदल्यात चारचाकी वाहनांना ‘व्हिल क्लॅम्‍प’साठी फक्त १०० रुपये दंड खूपच कमी असल्याने तो वाढविण्याचा ठराव महापालिकेसमोर आला व त्याला एकमताने संमती देण्यात आली आहे. त्यामुळे या नव्या दंडाची कारवाई लवकरच सुरू केली जाईल. कसिनो कार्यालये असलेल्या भागात महापालिकेचे संध्याकाळी ते रात्री उशिरा चार निरीक्षक नेमण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तेथे होणारी वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे. पणजीत दिवसाला सुमारे ६०० टॅक्सी पार्किंग होत असतात, त्यामध्ये अधिक तर पणजी बाहेरील असतात, असे मडकईकर म्हणाले.  पणजी महापालिका क्षेत्रातील दोनापावल, मिरामार, पणजी चर्चस्क्वेअर, कसिनो कार्यालये असलेला परिसर या ठिकाणी येत्या काही दिवसांपासून दिवसाही कारवाईला सुरवात केली जाणार आहे. 


मोन्सेरांतकडून २०० ‘व्हिल क्लॅम्प’
काही दिवसांपूर्वी पणजीचे आमदार आतानासिओ ऊर्फ बाबूश मोन्सेरात यांनी कसिनो कार्यालये असलेल्या परिसरात रात्रीच्यावेळी भेट देऊन बेशिस्त तसेच नो पार्किंगमध्ये होत असलेल्या वाहनांच्या पार्किंगबाबत संताप व्यक्त केला होता. वाहतूक पोलिसांकडे ‘व्हिल क्लॅम्प’चा तुटवडा असल्याने त्यांनी स्वखर्चातून पणजी महापालिकेला २०० ‘व्हिल क्लॅम्प’ पुरस्कृत केले आहे. ‘नो पार्किंग’मध्ये वाहने उभी करणाऱ्यांविरुद्ध दिवसा तसेच रात्री उशिरापर्यंत कारवाई करण्यासाठी पणजी महापालिकेतर्फे लवकरच निविदा काढली जाणार आहे, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bomb Threat At Dabolim Airport: दाबोळी विमानतळ; अखेर ‘बॉम्‍ब’ची ती अफवाच

Goa Today's Live News: भाजपला सत्तेतून हटविण्याची वेळ आलीय - मिकी पाशेको

Richest Candidate Pallavi Dempo: पल्लवी धेंपे तिसऱ्या टप्प्यात देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार

''भारत महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय अन् आपण भीक....''; पाकिस्तानी खासदाराचा शाहबाज सरकारला घरचा आहेर

Harmal News : डबल इंजीन सरकारमुळेच विकास : दयानंद सोपटे

SCROLL FOR NEXT