A fish species called Janitor was found in a pond at Kasavali in Goa
A fish species called Janitor was found in a pond at Kasavali in Goa 
गोवा

माशांच्या स्थानिक प्रजातींवर शोभेच्या मासळीचे आक्रमण

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी: राज्याच्या अंतर्गत भागांतील ज्लस्रोतांमध्ये ॲक्वेरिअममध्ये(aquarium) वापरल्या जाणाऱ्या माशांच्या प्रजाती पोहोचलेल्या असल्याचे यापूर्वीच दिसून आलेले आहे. ही समस्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली असून त्यात आता आणखी एका प्रजातीची भर पडली आहे.(A fish species called Janitor was found in a pond at Kasavali in Goa)

कासावली(Kasavali) येथील तळ्यामध्ये जेनिटर नावाची एक मासळीची(Fish) प्रजाती सापडली असून सदर मासळीही ॲक्वेरिअममध्ये वापरली जाते. ही मासळी देखील चिंताजनक प्रमाणात सापडलेली आहे. त्यामुळे शोभेच्या मासळीच्या आक्रमणाची दखल घेऊन जैवव्यवस्थापन करण्याची गरज तज्ज्ञांकडून पुन्हा व्यक्त होऊ लागली आहे.

यापूर्वीच ॲक्वेरिअममध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘मोझांबिक तिलापिया’ आणि ‘आफ्रिकन कॅटफिश’ यांनी गोव्यातील जलस्रोतांमध्ये आपले बस्तान बसविल्याचे दिसून आलेले आहे. त्यात आता वरील तिसऱ्या प्रजातीची भर पडलेली आहे. यामुळे माशांच्या स्थानिक प्रजातींवर आक्रमण होऊन त्यांची संख्या कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा गोड्या पाण्याच्या जलस्रोतांमध्ये पकडलेल्या मासळीत पन्नास टक्क्यांहून जास्त शोभेची मासळी आढळलेली आहे. तसेच त्या ठिकाणी स्थानिक प्रजातींच्या लहान मासळीच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले आहे. ज्या तळ्यांमध्ये अशी शोभेची मासळी आढळून आलेली आहे, अशा तळ्या इतर जलस्रोतांशी जोडलेल्या आहेत का आणि त्यात पुराचे पाणी येते का हे तपासून पाहायला हवे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

केरळ राज्यात अशा शोभेच्या मासळीच्या आक्रमणामुळे गोड्या पाण्याच्या जलस्रोतांतील मत्स्यसंपदेवर मोठा परिणाम झालेला असून त्याचा फटका स्थानिक प्रजातींच्या मासळीला बसला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सदर मासे जेथे आढळून आले आहेत त्या तळ्यांचे पाणी पूर्णपणे उपसावे असा एक उपाय तज्ज्ञांनी सूचविलेला आहे. तसेच ‘ॲक्वेरिअम’ सांभाळणाऱ्या लोकांनी त्यातील माशांची विल्हेवाट लावताना कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात जागृती करण्याची गरजही तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

Kala Academy Viral Video: मंत्र्यांसारखे कला अकादमीचे लाईट्स रंग बदलतात; राजदीपचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT