Fish sellers disappear in Vasco
Fish sellers disappear in Vasco 
गोवा

वास्कोत मासळी विक्रेत्या गायब

Dainik Gomantak

मुरगाव, 

मांगोरहिल येथील झोपडपट्टीतील एका मासे विक्रेत्याच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर या वस्तीतून घरोघरी मासे विक्री करणाऱ्या महिला या घटनेनंतर गायब झालेल्या. त्यामुळे गेले दोन दिवस घरबसल्या मासे खरेदी करणाऱ्यांची पंचाईत झाली.

मुरगाव पालिका क्षेत्र तसेच चिखली परीसरात मांगोरहिल येथील महिला घरोघरी जाऊन मासे विक्री करण्याचा व्यवसाय करीत होत्या. तर काही पुरुषही दुचाकी वाहनांतून वाड्यावाड्यावर जाऊन मासे विक्री करायचे. पण, सोमवारी कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यावर सर्वांचीच पाचावर धारण बसली.
घरोघरी मासे विक्री करण्यासाठी बायणा येथूनही काही बिगर गोमंतकीय महिला फिरत होत्या. त्याही या घटनेनंतर गायब झाल्याचे दिसून आले. वास्कोतही ठीक ठिकाणी रस्त्यावर बसून मासे विक्री "त्या" लोकांकडून केली जायची तीही बंद झाली आहे.

वास्कोतील मासळी मार्केटमध्येही बिगर गोमंतकीय विक्रेत्या महिला मासे विक्री करीत होत्या, त्यांची उपस्थितीही कमी झाली आहे. मांगोरहिल झोपडपट्टीतील बरेच जण विविधांगी व्यवसाय वास्कोत करीत होते.

तथापि, लॉकडाऊनमुळे त्यांना वस्तीतच घरात बसावे लागले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेल्यास परिस्थिती बरीच भयानक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या वस्तीतील बाधीत लोक कोणाच्या संपर्कात आलेले आहेत, याचा शोध घेणे कठीण बनले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT