Panjim Municipality
Panjim Municipality Dainik Gomantak
गोवा

Panjim Municipality: ...यामुळे सत्ताधारी नगरसेवकांना प्रश्‍न मांडणेही भीतीचे

दैनिक गोमन्तक

Panjim Municipality: पणजी महापालिकेत विरोधी नगरसेवक काहीही बोलला तरी चालेल; पण सत्ताधारी गटातील नगरसेवकाने प्रश्‍न उपस्थित केल्यास त्याला लक्ष्य करण्याची पद्धत आजही कायम आहे. अनेक सत्ताधारी गटातील नगरसेवक काही बोलले तर ते ‘हिटलिस्टवर’ येतात.

त्यामुळे शहराचा एक नगरसेवक म्हणून सार्वजनिक प्रश्‍नावर तोंड उघडले तर येणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याचे धाडस ठेवावे, असाच एकप्रकारे संदेश मागील दारातून येत असावा, असे वाटते.

महापालिकेची शुक्रवारी सभा झाली. त्या सभेत इतिवृत्तावर 24 विषय होते, त्यावर इतर सत्ताधारी नगरसेवकांनी आपल्या महापौरांची आणि सत्ताधारी बाजू सांभाळायची असते, हे किती नगरसेवकांना माहीत आहे कोणास ठाऊक. सध्या महापालिकेत पाच विरोधी नगरसेवक आहेत. तर दोन स्वीकृत नगरसेवकांसह 27 सत्ताधारी पक्षाचे आहेत.

त्यामुळे पाच नगरसेवकांच्या प्रश्‍नांवर स्पष्टीकरण द्यायची वेळ आली तर बेंटो लॉरेन यांना ती भूमिका पार पाडावी लागते. इतर नगरसेवकांमध्ये विठ्ठल चोपडेकर, शुभम चोडणकर, प्रमेय माईणकर हे अनुभवी आहेत. स्वीकृत नगरसेवकांमध्ये किशोर शास्त्री बोलल्यास विरोधी नगरसेवक रागावतात.

कबिर पिंटो माखिजा हे स्वीकृत असले तरी ते मुद्देसूद आणि आपल्या प्रभागातील विषय मांडत असतात. तर महिलांमध्ये काही अनुभवी नगरसेवक आहेत, परंतु त्या सत्ताधारी गटातील असल्यामुळे गप्प बसण्याशिवाय आणि प्रभागातील काही मुद्दे असतील तरच बोलणे एवढेच त्यांची भूमिका दिसते.

माजी महापौर चोडणकर यांनी महापालिकेच्या मालकीच्या शौचालयांची स्थिती मांडली. पणजी-बेती फेरीधक्क्यावरील शौचालयांचे काय झाले, हे सर्वांनाच माहीत आहे.

त्याचीच री ओढत फुर्तादो यांनी महापालिकाच कॅसिनोंना द्या किंवा त्यात विलीन करा, असा टोमणा मारला. चोडणकरांनी मळ्यातील वाहन पार्किंग समस्या, महापालिकेची शववाहिका यांचे विषय मांडले.

तत्पूर्वी पाटोवरील इमारत उभारणी करणाऱ्या एका विकासकाचे कार्यालय रस्त्यावर थाटण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणावरून चोडणकर व विठ्ठल चोपडेकर यांनी चौकशी मागितली; पण ही चौकशी करण्याचे धाडस महापौरांनी दाखविले नाही. उलट एका आठवड्यात पाटोवरील ती कार्यालये हटविली जातील, असे सभागृहाला सांगून या विषयावरील चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

शेवटी कोटी रुपये उद्यानावरच खर्च?

शहरातील उद्यानांची देखभाल राखण्यावर महापालिकेचे लाखो रुपये खर्च होतात. त्यामुळे ही उद्याने खासगी कंपन्यांना देण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यामुळे आता यापूर्वी 1 कोटी 38 लाखांचा चौदाव्या वित्त आयोगाचा शिल्लक निधी करंजाळे येथील उद्यानावर खर्च करणार असल्याचे सांगितल्याने नगरसेवकांना नक्कीच धक्का बसला असणार.

परंतु याच मुद्यावरून सुरेंद्र फुर्तादो यांनी हा निधी खर्च केला नाहीतर पंधराव्या वित्त आयोगाची रक्कम मिळणारच नाही, हे लक्षात घ्यावे, असा सल्लाही दिला.

इतिवृत्ताचा अभ्यास महत्त्वाचा..!

नगरसेवक उदय मडकईकर यांनी शहरातील रस्ते व इतर खोदकामाचा विषय मांडला, तेव्हा त्यांनी उपस्थित सर्व नगरसेवकांना या प्रश्‍नावर सहमत आहात काय, असा सवाल केला. त्यावर हो म्हणायचे की नाही, असा अनेकांना प्रश्‍न पडलेला दिसत होता.

अनेक नगरेसवकांकडे बैठकीतीली इतिवृत्ताविषयी अजेंडाच्या प्रति दिलेल्या असतात, पण त्याचा अभ्यास करण्याची कितीजणांना आवड असते कोणास ठाऊक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

Dhargal Hit And Run Case: धारगळमध्ये तो अपघात नव्हे खूनच! उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक

Lost From Beach: गोव्यात विविध बीचवरुन पाच मुले बेपत्ता; 'दृष्टी'ने घडवली कुटुंबियांशी पुन्हा भेट

Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

Vasco News : चिखलीत बिल्डरने अवैधपणे बनवली पार्किंगसाठी जागा

SCROLL FOR NEXT