Eighteen new coronavirus patients in Dicholi taluka
Eighteen new coronavirus patients in Dicholi taluka 
गोवा

डिचोलीत तालुक्यात अठरा  नवे कोरोनाबाधित रुग्ण 

गोमंतक वृत्तसेवा


डिचोली: मागील आठवड्यापासून डिचोली तालुक्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असला,  तरी आज मंगळवारी तालुक्यात रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. आज तालुक्यात १८ नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत, तर मागील जवळपास पंधरा दिवसांपासून डिचोलीतील कोविड सुविधा केंद्रात एकही रुग्ण नसल्याची माहिती मिळाली आहे. आज साखळी विभागात रुग्णसंख्या वाढताना १२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

डिचोली विभागात केवळ एक, तर मये विभागात ५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे. मंगळवारी डिचोली विभागात ३१, मये विभागात ३३ आणि साखळी विभागात २५ मिळून तालुक्यात एकूण ८९ कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे.

आज तालुक्यातील डिचोली विभागात १३,  मये विभागात ५ आणि साखळी विभागात ९ मिळून २७ रुग्ण बरे झाले आहेत. डिचोलीत - २८, मयेत - ३१ आणि साखळीत - १९ मिळून ७८ रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. डिचोलीतील ३, मयेतील २ आणि साखळीतील ६ मिळून तालुक्यातील ११ रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार चालू आहेत, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT