Drinking water is not available in Ambeudak area of ​​Savarde
Drinking water is not available in Ambeudak area of ​​Savarde 
गोवा

आंबेउदक महिलांनी दिला आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा

गोमंतक वृत्तसेवा

कुडचडे : साळावली धरण सात किमी अंतरावर असताना सावर्डे मतदारसंघातील आंबेउदक परिसरात पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि वास्को परिसरात दररोज पाणी मिळते, हे आमचे दुर्दैव आहे. प्रत्येक निवडणूक काळात डिसेंबरपर्यंत पाणी उपलब्ध करू, अशी आश्वासने दिली जातात. पण, अद्याप ‘तो’ डिसेंबर येत नसल्याने सुरळीतपणे सरकार नळद्वारे पाणीपुरवठा न केल्‍यास आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा आंबेउदक भागातील महिलांनी दिला.

अडीचशे घरांसाठी टँकरने पाणीपुरवठा
आंबेउदक येथे साधारण अडीचशे घरे आहेत. या गावासाठी दिवसातून चार टँकर पाणी पुरविण्यात येते. तेसुद्धा सुरळीत नाही. टँकरची एक फेरी झाल्‍यावर चालक गायब होतो, असा आरोप महिला करीत आहे. जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होईपर्यंत दिवसाला किमान सहा टँकर पाणी पुरविण्याची मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत. साठवून ठेवलेले पाणी वापरण्‍यायोग्‍य नसते.  वेळप्रसंगी नाईलाजाने त्‍या पाण्‍याचा वापर करावा लागतो, असे महिलांनी सांगितले. टँकरद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर कपडे धुण्यापासून भांडीधुणी, अंगोळ आणि स्वयंपाक बनविण्यासाठी केला जातो. पाणी येणार म्हणून घरातील एका माणसाला इतर कामे सोडून टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. 

अधिकाऱ्यांत एकवाक्यता नाही!
‘जायका’चे पाणी येणार येणार म्हणून केवळ आश्वासने दिली जात आहे. पाणी पाणी म्हणून रस्त्यावर उतरल्यावर सरकारी अधिकारी येऊन जनतेच्या डोळ्यांना पाणी लावून जातात, पण परत काहीच नाही. कोण अधिकारी कुपनलिकेद्वारे पाणी पुरविणार म्हणून सांगतात तर दुसरा ‘जायका’चे पाणी पुरविणार म्हणून सांगून निघून जातात. मात्र गेले आयुष्यभर टॅंकरचेच पाणी प्यावे लागत आहे. टेंडर झाले, डिसेंबरमध्ये पाणी येणार, काम सुरू झाले आहे, पुढील महिन्यात पाणी मिळणार, अशी खोटी आश्वासनेच दिली जात आहेत. पण, प्रत्यक्षात पाणीच नाही ही आजची परिस्थिती असल्याचे चित्र महिलांनी दाखविले. 


टँकरचालकाचीही मनमानी?
धडे गावापर्यंत जायकाचे पाणी पोहचले आहे. तेथून पुढे आंबेउदक गावात पाणी पोहोचत नाही. अडीचशे घरांना दिवसा चार टँकर पाणी पुरत नाही. तेसुद्धा टँकर चालकाच्‍या मनात येईल, त्यावेळी पुरविले जाते. या प्रकाराने ग्रामस्थ संतप्‍त झाले आहे. सरपंच, आमदार यांना विनंती केली आहे की शक्य तितक्या लवकर पाणी जलवाहिनीद्वारे पुरविण्यात यावे. पाण्यासाठी ग्रामस्थ रस्त्यावर येताच सरकारी अधिकाऱ्यांना पाठवून लोकांना काही वेळापुरते शांत करण्यात येते. पुढे काहीच हालचाली केल्या जात नाहीत, असा आरोपही करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांच्या सावर्डे मतदारसंघात हे घडत असल्याने त्यांनी या प्रश्नावर तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याचा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
 
अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण 
आणि पुन्‍हा आश्‍वासन!

पाणीपुरवठा खात्याचे अधिकारी अजूनही केवळ सर्व्हेक्षण करीत आहेत. विचारल्यास पुढील चार महिन्यात पाणी मिळणार म्हणून सांगतात. पण प्रत्यक्षात पाणीच नाही. पाणीपुरवठा होणार म्हणून सांगितले जाते. पण, जलवाहिनीचे पाणी दिले जात नाही. हिच परिस्थिती कायम राहिल्यास आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याशिवाय आता पर्याय राहिला नसल्याचा इशारा आंबेउदक भागातील जनतेने दिला आहे. यावेळी सावर्डे ग्रामपंचायत सदस्य उल्हास नाईक, ग्रामस्थ राजू शिरोडकर व महिला रोशनी नाईक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला रस्त्यावर आल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT