Double murder in Margaon two senior citizens have been murdered
Double murder in Margaon two senior citizens have been murdered 
गोवा

धक्कादायक! मडगावमध्ये दुहेरी हत्याकांड; दोन वृद्धांची हत्या

गोमन्तक वृत्तसेवा

चंद्रवाडो : अंबाजी मडगावमध्ये दुहेरी हत्याकांडची घटना उघडकीस आली आहे. या हत्याकांडच्या घटनेने मडगावत खळबळ माजली आहे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिंगेल मिरांडा (65) व कॅटरिना पिंटो (85) या दोन्ही वृद्धांची हत्या करण्यात आली आहे. हे दोन्ही मृतदेह बांधून ठेवलेल्या अवस्थेत घराच्या मागील खोलीमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी मडगाव पोलिस अधिक तपास करत आहेत. 

गेल्या वर्षी मडगाव शहरात भरदिवसा वाळके या ज्वेलरी शोरूमच्या मालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून राज्यात भरदिवसा चोऱ्यांचे तसेच दरोड्यांच्या घटना घडत आहेत. मात्र पोलिस यासंदर्भातची माहिती उघड करत नाहीत. परप्रांतीयांच्या चोरट्यांच्या टोळ्या राज्यात सक्रिय झाल्या असून भरदिवसा बंद असलेले फ्लॅट लुटण्याच्या तक्रारी पोलिस स्थानकात नोंद झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वा जुन्या पाटो पुलाजवळील सरकारी वसाहतीमध्ये एका पत्रकाराच्या फ्लॅटमध्ये चोरी झाली होती. अनेक भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT