Noise Pollution Dainik Gomantak
गोवा

Noise Pollution : प्रशासनाच्‍या नाकावर टिच्चून धांगडधिंगा; समुद्रकिनाऱ्यांवर होतोय रात्रीचा दिवस

Noise Pollution : उत्तर गोव्‍यातील विदारक स्‍थिती

गोमन्तक डिजिटल टीम

निवृत्ती शिरोडकर

Noise Pollution : मोरजी, ध्‍वनिप्रदूषणाच्‍या विषयावरून राज्‍य सरकारला वारंवार मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या गोवा खंडपीठाकडून फटकारले जाते. तरीही किनारी भागात नियमांचे उल्‍लंघन करून संगीत पार्ट्यांचा धांगडधिंगा सुरूच आहे.

उत्तर गोव्‍यातील मोरजी, आश्‍‍वे, मांद्रे, हरमल, कळंगुट, कांदोळी, बागा, वागातोर, हणजूण, शापोरा आदी किनाऱ्यांवर तर सध्‍या रात्रीचा दिवस केला जात आहे. परंतु सरकारी यंत्रणा हातावर हात ठेवून गप्‍प आहे. न्‍यायालयाच्‍या आदेशाची ही पायमल्ली आहे.

पर्यटन हंगाम सुरू झाला की गोव्‍यात संगीत पार्ट्यांना ऊत येतो. काही पर्यटक तर मुद्दामहून या पार्ट्यांसाठी हजेरी लावतात. रात्री उशिरापर्यंत बेकायदा सुरू असलेल्‍या या बेकायदा पार्ट्यांमधून मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असते आणि ते रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा कमी पडतेय.

मोरजी व आश्‍‍वे-मांद्रे हे दोन किनारे कासव संवर्धन मोहिमेसाठी आरक्षित केले आहेत. तरीही तेथे अशांतता माजवली जात आहे. न्यायालय सरकारी यंत्रणांचे कान उपटते, पण त्‍याचा अजून तरी काहीच परिणाम झालेला नाही.

ध्‍वनिप्रदूषणाविरोधात लोकांच्या तक्रारी वाढत आहेत. या तक्रारींची दखल घेऊन मोरजी पंचायतीने उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षकांना लेखी निवेदन देऊन त्‍यावर नियंत्रण मिळवण्याची मागणी केली आहे.

- मुकेश गडेकर, सरपंच (मोरजी)

कारवाई करणार कोण?

येत्‍या १५ डिसेंबरनंतर संगीत रजनी पार्ट्यांमध्‍ये वाढ होणार आहे. तशा जाहिराती सोशल मीडियावरून प्रसारित होत आहेत.

ध्‍वनिप्रदूषण रोखण्‍यासाठी कोणत्‍या यंत्रणा कार्यान्‍वित राहतील, याची कोणतीही माहिती सरकारने जारी केलेली नाही.

अशा पार्ट्यांमधून लाखो रुपयांची उलाढाल होते. सरकारी अधिकाऱ्यांचे हात ओले केले जातात. म्‍हणून त्‍याकडे डोळेझाक होत आहे, असा नागरिकांचा आरोप आहे.

कीड वेळीच ठेचण्याची गरज

मोरजी, आश्‍‍वे-मांद्रे ही किनारपट्टी कासव संवर्धनासाठी राखीव क्षेत्र म्हणून घोषित केलेली आहे. तरीसुद्धा तेथे राजरोसपणे कायद्याचे उल्लंघन करून व उच्च न्यायालयाला न जुमानता संगीत पार्ट्यांचा धूमधडाका सुरूच असतो. आता या बेकायदा कृत्‍यांना आळा कोण घालणार? स्थानिक लोक अशा पार्ट्यांमुळे त्रस्‍त झालेले आहेत.

रुग्‍ण, ज्‍येष्‍ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मन:स्‍ताप सहन करावा लागतोय. हे सर्व गैरकारभार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? आता नागरिकांनीच आवाज उठविण्याची गरज आहे. कारण संपूर्ण किनारपट्टीला लागलेली ही कीड ठेचावीच लागेल, असे खुद्द लोकच बोलू लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

SCROLL FOR NEXT