Digambar Kamat
Digambar Kamat  
गोवा

IIT संकुल विरोध आंदोलन प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यात यावे: दिगंबर कामत

दैनिक गोमन्तक

पणजी: सत्तरी तालुक्यातील शेळ मेळावली येथील पूजा मेळेकर या युवतीवरील आयआयटी संकुल विरोध आंदोलन प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सरकारकडे केली आहे. पूजा हिने अॅनालिटिकल रसायनशास्त्र या विषयात तृतीय वर्ष विज्ञान शाखेच्या परीक्षेत विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. सरकारने तिच्यावरील गुन्हे मागे घेऊन तिने हा बहुमान मिळवल्याबद्दल तिला गुन्हे मागे घेण्याची भेट द्यावी असे कामत यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

गोव्यात आय आय टी संकुलाला ठिकाणी विरोध होत आहे. सुरूवातीला हा प्रकल्प काणकोण तालुक्यातील लोलये येथील पठारावर होणार होता यानंतर तेथून तो सांगे येथे हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सत्तरी तालुक्यातील शेळ मेळावली येथे सरकारी जमीन असल्याचे पाहून त्या जमिनीत हा प्रकल्प नेण्याचे सरकारने ठरवले. त्याला ग्रामस्थांनी मोठा विरोध केला विशेषतः तरुण-तरुणींनी या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर भाग घेतला होता. या आंदोलनकर्त्यांत पूजा हिचाही समावेश होता. पोलिस आणि ग्रामस्थ यांच्यात थोडा संघर्षही यानिमित्ताने झाला.

दरम्यान, प्रकरणी पोलिसांनी ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यात पूजा हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता तिने ग्रामीण भागात राहूनही रसायनशास्त्र सारख्या विषयात विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवल्याने तिच्यावरील गुन्हे मागे घेऊन तिला सरकारने भेट द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेते कामत यांनी ग्रामस्थांची ही संवेदना आपल्या ट्विटर हॅण्डलवरून व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Air Pollution: वायू प्रदूषणानं वाढवली चिंता! टाईप 2 डायबिटीजच्या रुग्णांमध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ; संशोधनातून खुलासा

Goa Today's Live News Update: लाच, खंडणी प्रकरण! पिळगावकरांना न्यायालयीन कोठडी

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

SCROLL FOR NEXT