Goa Professional Football League
Goa Professional Football League Dainik Gomantak
गोवा

Goa Professional Football League: धेंपो क्लबने सलग दुसऱ्यांदा पटकावले प्रोफेशनल लीगचे विजेतेपद

किशोर पेटकर

Goa Professional Football League: सामन्यातील शेवटची दोन मिनिटे बाकी असताना बदली खेळाडू पेद्रू गोन्साल्विस याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर धेंपो स्पोर्टस क्लबने सलग दुसऱ्यांदा गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

वास्को येथील टिळक मैदानावर शुक्रवारी झालेल्या स्पर्धेच्या सुपर लीग फेरीतील निर्णायक सामन्यात धेंपो क्लबने एफसी गोवा संघावर 1-0 असा निसटता विजय प्राप्त केला. त्यामुळे त्यांचे 15 लढतीतून सर्वाधिक 30 गुण झाले. त्यांचा हा स्पर्धेतील नववा विजय होता. विजेतेपदासाठी त्यांना शेवटचा सामना जिंकणे अत्यावश्यक होते. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये धेंपो क्लबच्या मायरिक हिलारियो याला रेड कार्ड मिळाले, पण त्याचा प्रतिकुल परिणाम समीर नाईक यांच्या मार्गदर्शनाखालील संघाच्या विजेतेपदावर झाला नाही. एफसी गोवाचा हा स्पर्धेतील पहिलाच पराभव ठरला, त्यामुळे त्यांचे 22 गुणांसह चौथे स्थान कायम राहिले.

स्पोर्टिंग क्लबला उपविजेतेपद

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने चर्चिल ब्रदर्सला 3-0 असे सहजपणे नमवून 29 गुणांसह स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले. रोहन रॉड्रिग्ज याने आठव्या मिनिटास आघाडीचा गोल केल्यानंतर लॉईज कार्दोझने दोन गोल नोंदवून स्पोर्टिंगच्या स्पर्धेतील नवव्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने अनुक्रमे 39 व 50व्या मिनिटास चेंडूला गोलनेटची दिशा दाखविली. चर्चिल ब्रदर्सला चौथा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ते 21 गुणांसह पाचव्या क्रमांकावर राहिले.

साळगावकर एफसी तिसऱ्या स्थानी

साळगावकर एफसीने कळंगुट असोसिएशनला 3-1 असे नमवून 28 गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला. सामना एला-जुने गोवे येथील धेंपो अकादमी मैदानावर झाला. मार्क कार्व्हालो याने 16व्या, उमंग गायकवाडने 42व्या, तर सौरभ पाटील याने 62व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे साळगावकर एफसीने आठवा विजय मिळविला. कळंगुटचा एकमात्र गोल प्रतेश शिरोडकर याने 60व्या मिनिटास केला. स्पर्धेतील पाचव्या पराभवामुळे त्यांचे 20 गुण व सहावा क्रमांक कायम राहिला.

16व्यांदा गोव्यातील चँपियन क्लब

धेंपो स्पोर्टस क्लबने एकंदरीत 16व्यांदा गोव्यातील चँपियन क्लबचा मान मिळविला. 2021-22 मोसमात विजेतेपद मिळविल्यानंतर त्यांनी नऊ विजय, तीन बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह यंदा जेतेपदावर नाव कोरले.

दृष्टिक्षेपात...

- धेंपो क्लबचे 30, स्पोर्टिंग क्लबचे 29, साळगावकरचे 28 गुण

- एफसी गोवाचे 22, चर्चिल ब्रदर्सचे 21, कळंगुट असोसिएशनचे 20 गुण

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

कोर्टात 13 महिन्यांच्या बाळाला तिने फरशीवर फेकले, न्यायाधीशही चकित झाले; वाचा नेमकं प्रकरणं

Goa Today's Live News: गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार - मुख्यमंत्री डॉ. सावंत

SCROLL FOR NEXT