dengue
dengue 
गोवा

डेंग्‍यूच्‍या रूग्‍णांत दुप्‍पटीने वाढ

Dainik Gomantak

डेंग्‍यूच्‍या रूग्‍णांत दुप्‍पटीने वाढ

२०१९ मधील आकडेवारी : सावधगिरी हाच उपाय, परिसर स्‍वच्‍छतेचे आवाहन
पणजी,  : घरातील पाण्‍याच्‍या कुंड्या, आजूबाजूला पडलेले रिकाम्‍या बाटल्‍या, डबे किंवा घरात स्‍वच्‍छ न करता कित्‍येक दिवसांपासून भरून ठेवलेल्‍या पाण्‍यात डेंग्‍यूचे मच्‍छर अंडी घालतात. गोवा आरोग्‍य खात्‍याने २०१९ साली डेंग्‍यूबाबत राज्‍यभरात जनजागृती मोहिम राबवूनही २०१८ च्‍या तुलनेत २०१९ साली डेंग्‍यूच्‍या रूग्‍णांच्‍या संख्‍येत दुप्‍पटीने वाढ झाल्‍याची माहिती मिळाली. २०१८ साली ३३५ रूग्‍ण तर २०१९ साली ७२५ डेंग्‍यूच्‍या रूग्‍णांची नोंद झाली असून गेल्‍या दहा वर्षांत हा आकडा सर्वांत जास्‍त आहे. 

डासांची पैदास कुठे?
राज्‍यात आम्‍हाला ज्‍या ठिकाणी डेंग्‍यूचे रूग्‍ण आढळले त्‍या ठिकाणी आम्‍ही जाऊन तपासणी केली. लोकांच्‍या घरातील फुलझाडांच्‍या कुंड्यांमध्‍ये आम्‍हाला डेंग्‍यूच्‍या डासांची अंडी सापडली आहेत. शिवाय गॅलरीत आणि आजुबाजूला असणाऱ्या पाण्‍यातही अंडी सर्रास सापडली. अनेकांच्‍या घरातील पाण्‍यांची भांडी तशीच होती, ती स्‍वच्‍छ धुवून सुकवून मग त्‍यात पाणी भरणे आणि त्‍या स्‍वच्‍छतेची काळजी घेणे अपेक्षित असते. मात्र, याबाबात सावधगिरी बाळगण्‍याचे प्रमाण कमी दिसून आले. 


मलेरियासारख्‍या रोगांचा प्रसार व्यक्तिपरत्‍वे होतो. मात्र, डेंग्‍यूचे तसे नाही. डासांची उत्‍पत्ती होऊ नये म्‍हणून काळजी घेतली, तर डेंग्‍यूसारख्‍या आजारावर नियंत्रण आणले जाणे शक्‍य आहे.
- डॉ. अनंत पालेकर, समन्‍वयक, व्‍हेक्‍टर बोर्न डिसिज नियंत्रण विभाग.

 


काय काळजी घ्‍यावी...
आठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी, भांडी घासून त्‍यांना उन्‍हात सुकवून मग त्‍यात पाणी भरावे. पाणी साठवलेल्‍या भांड्यांना योग्‍य पद्धतीने व्‍यवस्थित झाकून ठेवावे. घराभोवतालची जागा स्‍वच्‍छ आणि कोरडी ठेवावी. घरांच्‍या भोवताली व छतांवर वापरात नसणारे टाकाऊ साहित्‍य ठेऊ नये, हे उपाय केल्‍यास डेंग्‍यूच्‍या डासांची पैदास होणार नाही. 
 


डेंग्‍यूची लक्षणे काय?
डेंग्यू ताप हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू विषाणूंमुळे होतो. इडिस इजिप्‍ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो. डेंग्यूची लक्षणे ही सर्वसामान्य विषाणूसंसर्गाप्रमाणेच असतात. या रोगाची लक्षणे म्‍हणजे असह्य डोकेदुखी होऊ लागते, उलट्या होतात, अंग मोडून येते, शरीराला सूज येते. डेंग्यूच्या तापामध्ये सांधे दुखतात, कधीकधी अंगावर चट्टेही उठतात. अशी लक्षणे आढळून आल्‍यास डॉक्‍टरांकडे जाणे आवश्‍‍यक आहे.

तक्‍ता 
साल   डेंग्‍यूचे रूग्‍ण 
२०१४  १६८ 
२०१५  २९३
२०१६  १५०
२०१७   २३५
२०१८   ३३५
२०१९   ७२६

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT