Decrease in the number of Corona active patients in Bicholim area of Goa
Decrease in the number of Corona active patients in Bicholim area of Goa 
गोवा

कडक निर्बंधांचा सकारात्मक परिणाम; डिचोलीत  ''कोविड'' सक्रिय रुग्णसंख्येत घट

गोमंन्तक वृत्तसेवा

डिचोली: ‘कोविड’(Covid-19) ची दहशत वाढलेल्या  डिचोली(Bicholim) तालुक्यात  कोरोना सक्रिय रुग्णसंख्या(patients) हळूहळू घटत आहे. तर दुसऱ्याबाजूने कोरोनामुळे बळी जाण्याचे सत्र चालूच आहे. मागील चोवीस तासात साखळी परिसरातील एका 43 वर्षीय व्यक्तीसह तालुक्यात दोन व्यक्तींचे कोरोनामुळे बळी गेल्याची माहिती आरोग्य खात्याच्या(Health department) प्रसिद्धी पत्रकावरून मिळाली आहे. ‘कोविड’चे संकट दूर करण्यासाठी जनतेने योग्य ती काळजी घ्यावी. असे आवाहन सभापती राजेश पाटणेकर यांनी केले  आहे.(Decrease in the number of Corona active patients in Bicholim area of Goa)

सक्रिय रुग्णसंख्या घटली
डिचोली मामलेदार कार्यालयातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, मागील चोवीस तासात डिचोली विभागात 17 आणि मये विभागात 18 मिळून तालुक्यात 35 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. तर साखळी विभागात एकही संक्रमित रुग्ण आढळून आलेला नाही. डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात 839 सक्रिय रुग्ण आहेत. मागील आठवड्यात रुग्णसंख्येने हजाराचा आकडा पार केला  होता. 

कोरोना सक्रिय रुग्णसंख्या घटत असली, तरी बळींचे सत्र यामुळे डिचोली तालुक्यात पसरलेली धास्ती कायम आहे. दुसऱ्या बाजूने डिचोली शहरासह तालुक्यात जंतूनाशक औषध फवारणी आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात येत  आहे.दुसऱ्या बाजूने डिचोली शहरासह तालुक्यात जंतूनाशक औषध फवारणी आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात येत  आहे.

मागील दोन दिवसांपासून डिचोलीत  ''कोविड'' सक्रिय रुग्णसंख्या घटत आहे. ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. रुग्णसंख्या कमी होतेय म्हणून जनतेने गाफील राहता कामा नये. सामाजिक नियम पाळून योग्य ती खबरदारी घ्यावी. अनावश्यक घराबाहेर पडू नये. 
- राजेश पाटणेकर, सभापती.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa Today's Live News: NEET परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षा केंद्रात बदल

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

पालकांना त्यांच्या मुलांची नावं राहुल गांधी किंवा लालू यादव ठेवण्यापासून कोण रोखू शकेल?: जाणून घ्या SC ने असे म्हटले

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT