Goa Baby Day Care Centre Daini Gomantak
गोवा

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

Daycare Facilities For Working Women Goa: अनेक महिलांना बाळाच्या संगोपनासाठी बऱ्याचदा नोकरी सोडावी लागते. काही महिलांना आपली स्वप्ने, ध्येयधोरणे पूर्ण करता येत नाहीत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अनेक महिलांना बाळाच्या संगोपनासाठी बऱ्याचदा नोकरी सोडावी लागते. काही महिलांना आपली स्वप्ने, ध्येयधोरणे पूर्ण करता येत नाहीत. यासाठीच राज्यातील महिलांनी नोकरी, व्यवसाय वा आपल्या स्वप्नांची पूर्ती करत आत्मनिर्भर व्हावे, या हेतूने केंद्र सरकारच्या योजनेतून ९ तालुक्यांमध्ये अंगणवाडीच्या ठिकाणी पाळणाघरांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पालकांनी काय करावे?

पती-पत्नी दोघेही कामाला जातात, त्यावेळी बाळाची काळजी घ्यायला कुणीच नसते, अशा पालकांनी आपले मूल पाळणा घरात आणावे.

पाळणाघरात मुलांसाठी खेळणी व साधनसुविधा पुरविण्यात येतील.

मुलांना खाण्याच्या वस्तू, जसे दूध व इतर पदार्थ मात्र पालकांनी द्यावेत.

सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत हे पाळणाघर खुले असेल. मुलाची सर्व काळजी अंगणवाडीतील कर्मचारी घेतील.

...या गावांत असतील पाळणाघरे (Infant Day Care Centres in Goa)

१) बेतकीकरवाडा-वाळपई

२) बॉक-द-व्हॉक-पणजी

३) पोलिस क्वार्टस -पर्वरी

४) भिरोंडे-पेडणे

५) वडाचावाडा-डिचोली

६) तारीमळ-सांगे

७) कोंडी-केपे

८) सावरकटो-कुंकळ्ळी

९) भिकरवाडा-काणकोण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT