Dainik Gomantak
गोवा

Vasco: श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त शुक्रवारी वास्कोत दहीहंडी स्पर्धा

गोमन्तक डिजिटल टीम

श्री कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून वास्कोत शुक्रवारी (दि.19) दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. थ्री ब्रदर्स आर्ट अँड कल्चरल असोसिएशनने ही 44 वी दहीहंडी स्पर्धा आयोजित केलीय. यंदाच्या स्पर्धेसाठी गोविंद उर्फ विकी मांद्रेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

वास्को येथील थ्री ब्रदर्स आर्ट अँड कल्चरल असोसिएशन तर्फे वर्ष पद्धतीप्रमाणे यंदाही विश्वसुर्या पेपर स्टॉल समोर दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे या स्पर्धेचे 44 वे वर्ष असून 1978 साली किर्लोस्कर कंपनीतर्फे सदर स्पर्धेची सुरुवात केली होती. नंतर याची धुरा वास्को मार्केट संघाने सांभाळून या स्पर्धेला नाव थ्री ब्रदर्स आर्ट अँड कल्चरल असोसिएशन असे देण्यात आले.

स्पर्धेचे प्रथम बक्षीस 25 हजार रुपये व चषक आहे. तसेच स्पर्धेत सहभागी पथकांनाही बक्षीस देण्यात येईल. स्पर्धास्थळी सहा वाजेपर्यंत नाव नोंदणी केली जाईल. त्यानंतर आलेल्या पथकांचा विचार केला जाणार नाही असे आयोजकातर्फे कळविण्यात आले आहे. स्पर्धेपूर्वी उभारण्यात येणाऱ्या रंगमंचावर करमणूकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात कराओके ऑर्केस्ट्रा सादर केला जाईल.

गोविंद (विकी) मांद्रेकर

यंदाच्या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेली थ्री ब्रदर्सची समिती पुढील प्रमाणे.

गोविंद (विकी) मांद्रेकर (अध्यक्ष), जगदीश पवार (उपाध्यक्ष), दामोदर लोटलीकर (सचिव), नारायण मेंडेगलकर (खजिनदार),तसेच के राव, लक्ष्मण कुडाळकर, सुदेश कोलगावकर, भरत कोलगावकर, संकेत लोटलीकर, ब्रम्हा पवार, स्वप्नेष मोरजकर, विवेक खोब्रेकर, देवा आमोणकर, सुभाष राऊत, स्वप्निल कोलगावकर शैलेश गोवेकर आदी सर्वांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

Anti Aircraft Missile System: कोणत्या देशांकडे आहे बेस्ट एण्टी एअरक्राफ्ट मिसाईल सिस्टीम; भारताचं काय स्टेटस?

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

SCROLL FOR NEXT