Covid19 Goa 8 more die due to lack of oxygen Migration of 350 patients
Covid19 Goa 8 more die due to lack of oxygen Migration of 350 patients 
गोवा

Covid-19 Goa: ऑक्सिजन अभावी आणखी 8 जणांचा मृत्यू; 350 रुग्णांचे स्थलांतर

दैनिक गोमंतक

गोव्यात ऑक्सिजन (Oxygen) अभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू थांबताना दिसत नाहीत आज नव्यानं 8 कोरोना रुग्णांचा ऑक्सिजन अभावी बळी गेले असून ऑक्सिजन अभावी बळी जाण्याचा आकडा आता 83 झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा न्यायालयाकडून (Goa Court) याप्रकरणी गोवा सरकारला फटकारल्यानंतर आता गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयातील (Goa Medical College &Hospital) साडेतीनशे रुग्णांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्यात आला आहे. (Covid19 Goa 8 more die due to lack of oxygen Migration of 350 patients)

गोव्यात (Goa) आज नव्याने 58 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा आकडा 2056 झाला आहे. गोव्यात आतापर्यंत 1 लाख 34 हजार 542 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यापैकी 1 लाख 1 हजार सातशे बारा रुग्ण बरे झाले आहेत.नव्यानं 3 हजार 512 रुग्ण बरे झाले आहेत. तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 30 हजार 774 आहे. नव्याने 5 हजार 571 संशयितांच्या चाचण्या केले असता त्यापैकी 1957 कोरोना बाधित सापडले आहेत. उपचारासाठी 242 जणांना रुग्णालयात भरती केले असून 209 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबत गोवा फॉरवर्ड पक्षानं सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT