covid care centers in Fonda will be closed
covid care centers in Fonda will be closed 
गोवा

फोंड्यातील कोविड निगा केंद्रे होणार बंद

गोमंतक वृत्तसेवा

फोंडा :  राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात आटोक्‍यात आली असून रुग्ण संख्या रोडावल्याने आणि घरीच अलगीकरणाची मुभा देण्यात आल्याने फोंड्यातीलही कोविड निगा केंद्रात आता रुग्ण नसल्याने ही निगा केंद्रे बंद करण्यात येणार आहे. फर्मागुढी येथील तीनपैकी दोन निगा केंद्रे गेल्या १५ तारखेला बंद करण्यात आली असून एक निगा केंद्र येत्या १ नोव्हेंबरपासून बंद करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने फर्मागुढीतील अभियांत्रिकी महाविद्यालय वसतीगृह तसेच एनआयटी वसतीगृह ही दोन कोविड निगा केंद्रे बंद करण्यात आली आहेत. आता फक्त आयआयटी वसतीगृह निगा केंद्र येत्या १ तारखेपासून बंद करण्यात येणार आहे. तर शिरोड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र इस्पितळ असलेले निगा केंद्र येत्या १५ तारखेला बंद करण्याची शक्‍यता आहे. फक्त फोंड्यातील उपजिल्हा आयडी इस्पितळ हे कोविड इस्पितळ म्हणून कार्यरत राहणार आहे.


फोंडा तालुक्‍यात कोरोना रुग्णांनी सध्या घरीच अलगीकरणात राहण्यास प्राधान्य दिले आहे. त्यातच कोविड रुग्ण संख्याही त्यामानाने कमी झाल्याने सरकारी कोविड निगा केंद्राची आवश्‍यकता राहिलेली नाही. फक्त शिरोडा निगा केंद्र तेवढे आणखी पंधरा दिवस सुरू ठेवण्यात येणार आहे, तर रुग्ण नसल्याने फर्मागुढीतील निगा केंद्रे बंद झाल्यात जमा आहे.


फर्मागुढी येथील तीन तसेच शिरोडा येथील एक अशा चारही कोविड निगा केंद्रात फोंडा तालुक्‍याबरोबरच इतर भागातीलही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण नंतरच्या काळात कोविड निगा केंद्रातील रुग्णांची संख्या घटत राहिल्याने आता या निगा केंद्रांची आवश्‍यकता राहिलेली नाही. त्यामुळे फर्मागुढीतील तिन्ही निगा केंद्रे संबंधित महाविद्यालयांच्या व्यवस्थापनांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.  
फोंड्यात ४५ जणांचा गेला बळी
फोंडा तालुक्‍यात आतापर्यंत ४५ कोरोनाग्रस्त रुग्णांचा बळी गेला आहे. फोंडा तालुक्‍यातील विविध ठिकाणी हे बळी गेले असून त्यात खांडेपार येथील माय लेकाचाही समावेश आहे. फोंडा तालुक्‍यात कोरोनाचा पहिला रुग्ण हा आडपई भागात सापडला होता. फोंड्यातील सर्वात जास्त कोरोना मृत्यू हे साठ ते सत्तर व पुढे असलेल्या वयोगटातील रुग्णांचे झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

रोज सापडतात किमान २० रुग्ण
फोंड्यातील कोरोना चाचणी केंद्रात रोज किमान वीस रुग्ण सापडतात. काल एकाच दिवसात २८ रुग्ण सापडले असून, त्यापूर्वी हाआकडा वीस व त्याखाली होता. फोंडा शहरातील शांतीनगर भागात ६, खडपाबांध परिसरात ४, केरीत ४ तर दुर्गाभाट भागात ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल सापडले. विशेष म्हणजे कुर्टी भागात फक्त एकच रुग्ण सापडला आहे. पण हा आकडा वरखाली होत असून कधी कुर्टीत जास्त तर कधी फोंड्यात जास्त अशी संख्या असल्याची माहिती आरोग्याधिकाऱ्यांनी दिली. 

कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे लोकांनी आवश्‍यक काळजी घेणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याबरोबरच सामाजिक अंतरही राखण्याची आवश्‍यक आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे आणि आरोग्य खात्याच्या सूचनांचा अवलंब केल्यास राज्यातून कोरोना हद्दपार होईल हे नक्की. त्यामुळे स्वतःबरोबर इतरांचीही काळजी घ्या.
- रवी नाईक, आमदार, फोंडा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

SCROLL FOR NEXT