COVID-19 GOA
COVID-19 GOA 
गोवा

COVID-19 GOA: राज्यात 8 ठिकाणी 500 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी : गोव्यात(GOA) चाचण्‍यांच्या तुलनेत कोविड रुग्ण(COVID-19) सापडण्याचा दर 25.27 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. 5 मे रोजी चाचण्यांपैकी 51.6 टक्के जणांना कोविडची लागण झाल्याचे आढळले होते. त्याखालोखाल 7 मे रोजी 51.3 टक्के जणांना, तर 16 मे रोजी 33.9 टक्के जणांना कोविडची लागण झाली होती. हे सकारात्मक चित्र असताना दुसरीकडे कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. 13 मे नंतर यात 17 टक्के वाढ झाली आहे. 13 मे नंतर दररोज सरासरी 2 हजार 780 रुग्ण बरे झाले आहेत. याच कालावधीत दररोज सरासरी 1हजार 713 रग्ण सापडत आहेत. 13 मे नंतर राज्यात 601 जणांचा कोविडने मृत्यू झाला असून सरासरी 43 जणांचा दररोज मृत्यू झाला आहे. या महिन्यात आजवर 11 मे रोजी सर्वाधिक 75 जणांचा मृत्यू झाला आहे. 5 मे रोजी 71 तर 12 मे रोजी 70 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वात कमी मृत्यू हे 21 मे रोजी 30 नोंदले गेले आहेत.(COVID-19 GOA More than 500 corona patients at 8 locations in Goa)

गोव्यासाठी हा मोठा दिलासा असून सरकारच्या कोरोना नियंत्रण मोहिमेला यश मिळाले आहे. राज्यात कोरोनाबाधित बरे होण्याची टक्केवारी 88.03 वर आलेली आहे. राज्यात गेल्‍या दहा दिवसांत 18 ते 27 मे या कालावधीत 14 हजार 983 नवे कोरोनाबाधित रुग्‍ण सापडले,  तर 24 हजार 651 रुग्‍ण बरे झालेले आहेत. या दहा दिवसांमध्ये 1793 कोरोनाबाधितांनी इस्पितळात दाखल होऊन उपचार घेण्याचे ठरवले व इतरांनी गृहविलगीकरणात राहणे पसंत केले. याच काळात 1576 कोरोनाबाधितांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याच दहा दिवसांमध्ये 386 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य खात्याने आज दिलेल्या माहितीनुसार 27 मे रोजी एकूण 5951 कोरोना चाचणीसाठी घशातील स्रावाच्‍या नमुन्‍यांची  तपासणी करण्‍यात आली. आज जाहीर झालेल्या अहवालानुसार 1504 नवे कोरोनाबाधित रुग्‍ण सापडले, तर 1557 कोरोनाबाधितांच्‍या प्रकृतीत सुधारणा झाली. 

‘गोमेकॉ’त २३ मृत्‍यू
कोरोनामुळे गुरुवारी 27 रोजी 39 जणांचे मृत्‍यू झाले. त्‍यातील 23 जणांवर गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे उपचार सुरू होते, तर 8जण दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ मडगाव येथे मृत्‍यू झाला. 1 हॉस्पिशियो इस्पितळ मडगाव, 1केपे आरोग्य केंद्रात, 1 उत्तर गोवा खासगी इस्पितळात व 5 दक्षिण गोव्यातील विविध खासगी इस्पितळात मृत झाले. आज मृत्यू पावलेल्यापैकी चारजणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. तसेच एका 19 वर्षीय कळंगुट येथील युवकाचा समावेश आहे, तर 50 वर्षांखालील 8 व्यक्तींचा  समावेश आहे.

500 पेक्षा जास्त रुग्ण 8 ठिकाणी
राज्यात 8 ठिकाणी 500 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. मडगावचा क्रमांक पहिला असून तेथे 1455 रुग्ण असून पणजीत 893कोरोना रुग्ण आहेत. 

18 ते 27 मे या कालावधीतील आकडेवारी
एकूण दहा दिवसांतील कोरोना बाधीत 14983
बरे झालेले कोरोनाबाधित 24651
मृत्‍यू 386

मागील चोवीस तासांत 39 मृत्‍यू
आज सलग तिसऱ्या दिवशी 39 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या अडीच हजार पेक्षा जास्त होऊन ती 2538 वर पोहोचली. आजच्या दिवशी सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 15 हजार 699 एवढी आहे. 13 मे रोजी ती 32 हजार 953 एवढी होती. 27 मे पर्यंत राज्यात 1 लाख 52 हजार 401 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील 1 लाख 34 हजार 164 कोरोनाबाधीत बरे झाले, तर 2538 नागरिकांना कोरोनामुळे मृत्‍यू झाला. त्‍यात 18 वर्षांखालील 7 मुलांचा समावेश आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT