COVID-10 Goa 4008 patients were recovered yesterday
COVID-10 Goa 4008 patients were recovered yesterday 
गोवा

COVID-19 Goa: काल पहिल्यांदाच कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी: COVID-19 Goa गोवा राज्यात(Goa) काल पहिल्यांदाच डिस्चार्ज दिलेल्या कोरोना(Covid-19) रुग्णांपेक्षा दाखल झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज हाती आलेल्या स्वॅब चाचणी अहवालानुसार 1562 व्यक्ती कोरोनाबाधित सापडले, तर 4008 रुग्ण बरे झाले. नव्या कोरोना रुग्णांतील 189 जण इस्पितळांमध्ये(Hospital) दाखल झाले, तर उर्वरित गृह अलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. आज बरे झालेल्या एकूण 193 जणांना घरी पाठविण्यात आले. असे पहिल्यांदाच घडले आहे. राज्यात एकही कोरोना रुग्ण उपचाराविना राहणार नाही किंवा खाटाशिवाय राहणार नाही यासाठी सरकारचे(Goa Government) प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याचे सचिव रवी धवन(Ravi Dhawan) यांनी आज दिली.(COVID-19 Goa 4008 patients were recovered yesterday)

आरोग्य सचिवांनी आज पणजी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर व आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा उपस्थित होते. यावेळी रवी धवन म्हणाले, की गेल्या काही दिवसांमध्ये नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या बरीच वाढली आहे आणि ही गोव्यासाठी दिलासादायक बाब आहे. राज्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध असून सहा हजार कोरोना रुग्णांना दाखल करून घेण्याची क्षमता राज्य सरकारच्या आरोग्य खात्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोरोना रुग्णांवर मोफत उपचार सुरू असून लोकांनी या सेवेचा लाभ घ्यावा. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतरही घरी न राहता इस्पितळांमध्ये दाखल व्हावे. जेणेकरून कोरोना मृत्यूंची संख्या नियंत्रणात ठेवण्यात सरकारला मदत होणार आहे. दीनदयाळ स्वास्थ्य विमा योजनेचा  लाभ राज्यातील नागरिकांना खासगी इस्पितळांमध्येही मिळणार असून शंभर टक्के खर्च सरकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले, की गोमेकॉमध्ये प्राणवायूचा पुरवठा सुरळीत झाला आहे. ज्या कोरोना रुग्णांना उच्च डायबेटिसचा त्रास असतो त्यांना पहिले पाच दिवस बराच त्रास होतो. त्यामुळे त्यांनी कोरोनावर उपचार करण्यासाठी लगेच इस्पितळांमध्ये दाखल होणे गरजेचे आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता प्राणवायूसह इतर सर्व सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे प्रसिद्धी माध्यमांनीही  गोमेकॉबाबतचे वृत्त देताना नाकारात्मक भावना ठेवू नये व सत्य परिस्थिती लोकांसमोर मांडावी जेणेकरून लोकांत संभ्रम निर्माण होणार नाही, असेही डॉ. बांदेकर यांनी सांगितले.

‘तो भाग वादळामुळे कोसळला’
काल झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे सुपर स्पेशॅलिटी इस्पितळाच्या वरच्या मजल्यावरील काम सुरू असलेले सिलिंग कोसळले. मात्र ते  वादळामुळे कोसळले असून तेथील काम सुरू आहे, ते अद्याप पूर्ण झालेले नाही. त्या भागांमध्ये कोणीही कोरोना रुग्ण किंवा इतर कोणीही नव्हते. जोरदार वादळामुळे ही घटना घडली, असा खुलासा आरोग्य सचिव रवी धवन यांनी यावेळी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Lok Sabha Election 2024: ‘’चिदंबरम यांनी भ्रष्टाचार वाढवला, आरबीआयकडून सांगण्यात यायचे...’’; राजीव चंद्रशेखर यांचा हल्लाबोल

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

SCROLL FOR NEXT