pascol
pascol 
गोवा

कोरोनाचा सातवा बळी

Dainik Gomantak

दाबोळी :

गोव्‍यात कोरोनाचा सातवा व वास्‍कोत दुसरा बळी गेला. मुरगावचे नगरसेवक पास्कॉल डिसोझा (७२) यांचे शनिवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्यावर रविवारी संध्याकाळी वास्कोत सेंट अँड्र्यू चर्च दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे बंधू जुझे फिलिप डिसोझा व अन्य कुटुंबीय उपस्थित होते.
पास्कॉल हे मडगावच्या कोविड इस्पितळात उपचार घेत होते. मागील आठवड्यात पास्कॉल डिसोझा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल केले होते. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती एकदम खालावली आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ते वास्कोतील मांगोरहिल भागाचे नगरसेवक होते. २२ जून रोजी मुरगाव नगरपालिकेने पालिका मंडळाची बैठक बोलावली होती. त्यानंतर २४ जून रोजी दोन नगरसेवक व एका नगरसेविकेचा पती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्या आठवड्यात पालिकेतील सहा नगरसेवकांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना एमपीटी कोविड इस्पितळात दाखल केले होते. त्‍यात पास्कॉल यांचा समावेश होता. सदर बैठकीनंतर काही अधिकाऱ्यांनासुद्धा कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पास्कॉल डिसोझा यांचे छोटे बंधू माजी महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून सांत्वन केले. तसेच आजी, माजी, मंत्री, आमदार, उद्योगपती व इतरांनी सुद्धा जुझे फिलिप डिसोझा यांचे भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून सांत्वन केले.

चार व्‍यक्तींच्‍या उपस्‍थितीत अंत्‍यसंस्‍कार
नगरसेवक पास्कॉल डिसोझा यांचा अंत्‍यसंस्‍कार वास्को येथील सेंट अँड्र्यू चर्चच्या दफनभूमीत सायंकाळी सहा वाजता करण्यात आले. यावेळी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाद्वारे दफनभूमीत फक्त चार व्यक्तींना प्रवेश देण्यात आला. नगरसेवक पास्कॉल डिसोझा यांची अंत्‍ययात्रा त्यांच्या प्रभाग १७ मधून शववाहिकेतून काढण्यात आली.
नगरसेवक पास्कॉल डिसोझा यांच्या अंत्‍ययात्रेला मुरगाव नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्षा रिमा सोनुर्लेकर, नगरसेवक दीपक नाईक, फेड्रिक हेन्रीक्स, धनपाल स्वामी व काही मोजकेच निकटवर्तीय होते. वास्को पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक रितेश तारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवला होता. मुरगावचे उपजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी वर्ग सुद्धा यावेळी दफनभूमी जवळ उपस्थित होते.

मांगोरहिलमधून सलग
दोनवेळा विजयी
पास्कॉल हे मांगोरहिल येथील प्रभाग १७ चे नगरसेवक असून ते सलग दोनवेळा या भागातून निवडून आले होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे पार्थिव त्यांच्या प्रभाग १७ मधून जो भाग कंटेन्‍मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे, त्या लोकांना शेवटचे दर्शन मिळावे या हेतूने आणण्यात आले. कारण ते गरिबांच्या मदतीसाठी धावणारे सर्वांशी चांगले नाते ठेवणारे म्हणून ते परिचित होते. २२ जून रोजी मुरगाव पालिका बैठकीत त्‍यांनी लोकांना मदत करण्याची याचना केली होती. तसेच लोकांना पाहिजे असलेले मदत आपल्‍या मिळकतीतून देण्यात यावी, अशी विनंतीही त्‍यांनी केली होती. लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरवाव्या, अशी कळकळीची मागणी त्‍यांनी केली होती. ते त्यांचे शेवटचे बोल ठरले होते. दरम्यान, मडगाव येथून पास्कॉल यांचे पार्थिव मांगोरहिलमधून आणणार असल्याची माहिती लोकांना मिळताच सर्व लोक आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: विजय सरदेसाई यांनी काँग्रेस का सोडली? मनोज परब यांचा सवाल

Harmal News : डबल इंजीन सरकारमुळेच विकास : दयानंद सोपटे

Lok Sabha Elections 2024: वोट फॉर काँग्रेस; दिल्लीत यासिन मलिकसोबत मनमोहन सिंग यांचे पोस्टर कोणी लावले?

Colva Road Tree Cutting : कोलवा मार्गावरील प्रकार; फांद्या छाटण्‍याच्‍या नावाखाली झाडांची कत्तल

Goa News : भाजप सरकार धूळफेक करणारे : अमित पाटकर

SCROLL FOR NEXT