Environmentalist Rajendra Kerkar with Madhu Gavkar while inspecting Lady Finger at Khandala. Goa August 21, 2021
Environmentalist Rajendra Kerkar with Madhu Gavkar while inspecting Lady Finger at Khandala. Goa August 21, 2021 संजय घुग्रेटकर
गोवा

Goa: गोमंतकीयांकडून पारंपरिक भाज्यांचे संवर्धन

Sanjay Ghugretkar

खांडोळा, (प्रतिनिधी) : कष्टकरी गोमंतकीयांनी पारंपरिकता जपली असून, भेंडी, (Lady Finger) वांगी, तेंडली, वाल, मेरुलो (चवळी) (Wangi, Tendli, Wal, Merulo) सारख्या भाज्यांचे संवर्धन केले आहे. मुळात या रानटी भाज्या, पण पारंपरिकता जपताना त्यात कल्पकतेने बदल घडविले, नवीन बियाणे जतन केले. त्यामुळेच गोव्यात वेगळ्या प्रकारची वांगी, भेंडीचे ‘वाण’ जतन झाले असून, ही पिके घेतली जातात. त्यात तिसवाडीतील शेतकऱ्यांचे कार्य मोठे आहे. ताळगाव, सांतइस्तेव, जुवे परिसरात उत्तम शेती केली जाते, अशी माहिती पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी दिली. खांडोळा येथे मधू गावकर यांनी खडपावर माती टाकून पिकवलेल्या भेंडीच्‍या शेताची पाहणी केल्यानंतर केरकर बोलत होते.


श्री. केरकर म्हणाले, की भेंडीचे मूळ गोव्यातच आहे. जंगलात मिळणाऱ्या विविध भाज्यांपैकी भेंडी एक आहे. किमान दहा प्रकारच्या भेंडींची गोव्यात लागवड केली जाते. गोमंतकीयांनी कल्पकतेने केलेल्या प्रयत्नातून ‘सातशिरांची भेंडी’ फक्त गोव्यातच पिकवली जाते. तिची चव, धाटणी वेगळी आहे. पूर्वी सांतइस्तेव -जुवे परिसरात विविध प्रयोग केले जात होते. आजही तिसवाडी बेटावर विविध भाज्या घेतल्या जातात. ताळगाव, नेवरा, चोडण, कुंभारजुवे, सांतिस्तेव, मेरशी, आगशीसारख्या ठिकाणी वांगी, वाल, मिरची, भेंडीचे पीक घेतले जाते. येथील कष्टकरी समाजाने आपल्या कौशल्यानुसार शेतीत प्रयोग केले. वेगवेगळ्या भाज्यांचे जतन केले. नवनव्या प्रजाती शोधल्या. परकीय आक्रमणाच्या काळात सत्ता बदलली, धर्मांतरही झाले, पण मूळ गोमंतकीयांनी आपली परंपरा सोडली नाही. शेती करण्याचे कौशल्य जपले, त्यामुळेच येथील पारंपरिक भाज्या आजही अस्तित्वात आहेत. गोव्यात भेंडी फ्राय करतात, त्याचबरोबरच कोळंबीच्या आमटीतही भेंडीचा वापर करतात. त्यामुळे गोमंतकीय हुमण चवदार होते.

तवशांचे फेस्त
आपले पूर्वज पहिले पीक आले तर ते देवाला, देवीला अर्पण करीत होते. पूर्वी सांतान-सातेरीला अर्पण करायचे, पण धर्मांतरानंतर ‘सेंट ॲना’लाच देवी संबोधले जाऊ लागले आणि तेथे तवशांचे फेस्त सुरू झाले. धर्म बदलला तरी आपल्या परंपरा जपत, आपल्या कृषी संस्कृतीनुसार त्याच भावनेने देवाला, देवीला पहिले पीक अर्पण केले जाते, असे केरकर म्हणाले.

मेंदूचा विकास
सर्वांनी भेंडीची भाजी खाणे आवश्‍यक आहे. भेंडीतील चिकाला कंटाळू नये. कारण भेंडीत मेंदूला आवश्‍यक पोषक तत्त्‍वे असतात. मेंदूला होणारे अनेक विकार भेंडी खाण्याने बरे होतात. त्यात तथ्य असावे, म्हणून गावोगावी भेंडीचे पीक घेतले जाते. भेंडीच्या औषधी गुणधर्माबद्दल सांगितले जाते.

खडपावर भेंडीची शेती
खांडोळा-तामसुली येथे ७० वर्षीय शेतकरी मधू गावकर यांनी खडपावर मातीचा भराव टाकून भेंडी पिकविण्यायोग्‍य जागा तयार केली. जवळ जवळ दोन वर्षे त्‍यांनी काबाडकष्ट केले. दर पावसाळ्यात ही माती वाहून जात होती, तरीसुद्धा जिद्दीने पुन्हा पुन्हा मातीचा भराव टाकला, संरक्षक कुंपण घातले आणि गेली दोन वर्षे उत्तम प्रकारे भेंडीचे पीक घेतले जात आहे. साधारणतः ५०० चौ. मीटरपेक्षा अधिक जागेत हे भेंडीचे पीक घेतले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Due To Fasting: निर्जळी उपवास बेतला जीवावर, फोंड्यात बिहारच्या युवतीचा मृत्यू

Savoi Verem : निशानने धाग्यातून टिपला ‘द ग्लो ऑफ आई लईराई’;सावईवेरेतील युवा कलाकाराची कलाकृती

Goa Today's Live News: सांताक्रुज ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप सावंत

Arunachal Pradesh Crime: अरुणाचल प्रदेशात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 8 अधिकारी आणि पोलिसांसह 21 जणांना अटक

Digilocker Result : ‘डिजिलॉकर’वर निकाल देणारे गोवा दुसरे राज्य

SCROLL FOR NEXT