Goa Congress: गोवा प्रमुख माणिकराव ठाकरे यांनी लोकसभा 2024 निवडणुका आणि 2027 मधील विधानसभा निवडणुकीतही पक्ष जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.
गोवा दौऱ्यावर असलेले माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर आज पत्रकार परिषद घेवून राज्यात काँग्रेससाठी चांगली परिस्थिती असल्याचे सांगितले.
यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार फ्रांसिस सार्दिन, आमदार कार्लूस फेरेरा आणि आमदार एल्टन डिकॉस्ता उपस्थित होते.
"मला विश्वास आहे की आम्ही आमची संघटना मजबूत करू. कार्यकर्त्यांचा चांगला पाठिंबा असल्याने परिस्थिती चांगली आहे. 2024 ची लोकसभा आणि भविष्यात विधानसभा निवडणूकही जिंकू," असे ठाकरे म्हणाले.
ठाकरे राज्यातील नेते आणि कार्यकर्त्यांच्याही बैठका घेतल्या. "आमच्याकडे एक चांगला केडर आणि नेते आहेत. आम्ही उत्साहाने पुढे जाऊ आणि निवडणुका जिंकू," असे ते म्हणाले.
गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसला जिंकण्याचा विश्वास असल्याचे ठाकरे म्हणाले. "आमची स्थिती खूप चांगली आहे आणि आम्हाला दोन्ही जागा जिंकण्याचा विश्वास आहे. आगामी काळात आम्ही आमचे संघटन मजबूत करू," असे ठाकरे म्हणाले.
"आम्ही लोकांशी बोललो आणि त्यांना माहित आहे की पक्षांतर लोकशाहीला कसे हानी पोहोचवत आहे. मला खात्री आहे की लोक पक्षांतर करणाऱ्यांना धडा शिकवतील. जसे मागील विधानसभा निवडणुकीत झाले आहे तसेच पुढेही होईल," असे ते म्हणाले.
"भाजप धर्मावरून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणून राहुल गांधींनी ‘भारत जोडो यात्रा’ काढली. आता आम्ही मणिपूरमधून सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी ‘न्याय यात्रा’ सुरू करणार आहोत." असे ते पुढे म्हणाले.
माणिकराव ठाकरे यांनी पक्षाला तेलंगणात विजय मिळवून दिल्यानंतर नुकतीच गोव्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती, याआधी ठाकरे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून काम केले आहे आणि 8 वर्षे महाराष्ट्रात पक्षप्रमुख म्हणून काम करण्याचा अनुभव आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.