Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : ‘अवकाळी’चा गोंधळ प्लास्टिकला मागणी वाढली

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोलीतील ग्रामीण भागात पावसाळापूर्व कामांची लगबग सुरू झाली आहे. सध्या अवकाळी पावसामुळे ही कामे करताना अडचण निर्माण होत असली, तरी पावसाळा जवळ आल्याने ही कामे करण्यावाचून पर्याय राहिलेला नाही.

सध्या विविध ठिकाणी घरे शाकारणी आदी कामे सुरू असल्याचे आढळून येत आहे. वाढती मजुरी त्यातच घरे शाकारणी आदी कामे करण्यासाठी मजूर वेळेवर मिळणे दुरापास्त झाल्याने ही कामे करताना अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात गळतीपासून घरे सुरक्षित राहावीत.

यासाठी पावसाळ्यापूर्वी घरे शाकारणीची कामे आटोपून घेतात. मोसमी पावसाला अजून साधारण वीस दिवसांचा कालावधी असला, तरी सध्या अवकाळी पावसाचा कहर सुरू झाला आहे. घरांसह काही ग्रामीण भागात गुरांचे गोठेही शाकारणीची कामे सुरू आहेत.

पावसाळा सुरू होईपर्यत या कामांची लगबग दिसून येणार आहे. पावसाच्या झडीपासून संरक्षण मिळावे यासाठी बहुतेक घरांसह इमारतींना प्लास्टिकची आच्छादने घालण्यात येतात. त्यामुळे आता प्लास्टिकलाही मागणी वाढली आहे.

मजुरांचा भाव वाढला

एक काळ असा होता, की गावोगावी एकमेकांच्या सहभागातून घरे आणि गोठे शाकारणीची कामे करण्यात येत असत. मात्र, वेळेचा अभाव म्हणा किंवा अन्य कारणांमुळे कालांतराने या कामांसाठी मजुरांची गरज भासू लागली.

अलीकडच्या दहा-बारा वर्षांपासून तर बहुतेक भागात मजुरांच्या मदतीनेच घरे आणि गोठे शाकारणीची कामे करण्यात येत आहेत. एका बाजूने वेळेवर मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे, तर दुसऱ्या बाजूने दरवर्षी मजुरीही वाढत आहे.

घरे शाकारणी करण्यात सध्या मजूर हजार ते दीड हजार रुपये मजुरी आकारतात. तर मजुरांचा गट ठराविक रक्कम ठरवून ही कामे करीत आहेत. अन्य पर्याय नसल्याने आणि पावसाळा जवळ आल्याने अनेकजण मजूर सांगतात ती रक्कम मोजायला तयार असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT