Colva Opposes STP And Paragliding On Beach
सासष्टी: कोलवा ग्रामपंचायतीने सिवेज ट्रीटमेंट प्लांटला (एसटीपी) तसेच कोलवा किनाऱ्यावरील पॅराग्लायडिंगला विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात सरपंच सुझी फर्नांडिस यांनी सांगितले, की ज्यांनी ‘एसटीपी’ प्लांटसाठी प्रस्ताव पुढे केला त्यांच्याकडून आम्ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
या प्लांटची क्षमता, या प्लांटचे नेमके फायदे काय वगैरे, पण प्रस्तावाला आमच्या प्रश्नांची योग्य उत्तरे देता आलेली नाहीत. त्यामुळे कोलवा पंचायतीने पंचायत क्षेत्रात ‘एसटीपी प्लांट’ला विरोध केला आहे. कोलवा किनाऱ्यावर पंचायतीने पॅराग्लायडिंगला दिलेली परवानगी मागे घेतली आहे. आता त्यासाठी नवीन अर्ज आले आहेत.
आमच्या विरोधाची कारणेही आम्ही खात्याला कळविणार आहोत, असेही फर्नांडिस यांनी सांगितले. दरम्यान, कोलवा पंचायतीने पॅराग्लायडिंगला दिलेली परवानगी मागे घेतल्याने किनाऱ्यावरील व्यावसायिकांत नाराजी व्यक्त केली जात असतानाच आता पुन्हा पॅराग्लायडिंगसाठी नवीन अर्ज आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.