CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: 'मोदींची गॅरंटी' छत्तीसगडच्या नवीन मुख्यमंत्र्यांची टीम पूर्ण करेल; प्रमोद सावंत यांचा विश्वास

Akshay Nirmale

CM Pramod Sawant: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेशात भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. आता या राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची लगबग सुरू झाली आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय हे आज, बुधवारी शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत सहा मंत्रीही शपथ घेतील.

या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय भाजपचे नेतेही या सोहळ्यासाठी येऊ लागले आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी सिद्धार्थनाथ सिंह हे देखील छत्तीसगडची राजधानी रायपूरला पोहोचले आहेत.

दरम्यान, तत्पूर्वी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरकार आले आहे. मी छत्तीसगडमधील कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो.

राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि त्यांची संपूर्ण टीम मोदींची गॅरंटी नक्कीच पूर्ण करेल, हे मी खात्रीने सांगू शकतो.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी सिद्धार्थनाथ म्हणाले की, आज छत्तीसगडसाठी मोठा दिवस आहे. लोकांनी छत्तीसगडमध्ये भाजपचे आगमन अशक्य मानले होते. पण भाजपचे लोक, इथले नेतृत्व आणि पीएम मोदींच्या गॅरंटीने ते दिसून आले.

आजचा दिवस आनंदाचा आहे, म्हणून आपण सर्वजण पंतप्रधान मोदी आणि छत्तीसगडच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यासाठी आलो आहोत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grammy Award विजेता कलाकार गोवा सनबर्नमध्ये करणार सादरीकरण; Skrillex, DJ Peggy Gou यांची नावे जाहीर

Sindhudurg: गोव्यात मौजमजेसाठी येणाऱ्या पोलिसांना कर्तव्याचा विसर, कॉलेज तरुणीची काढली छेड, स्थानिकांनी दिला चोप

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

SCROLL FOR NEXT