Clinton Vaz civil engineer Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोव्याच्या अभियंत्याचे कचरा व्यवस्थापनाला दिशा देणारे 'व्ही-रिसायकल'! महिन्याला २०० टनांची विल्हेवाट

Sao Jose De Areal: राज्यात कचरा व्यवस्थापन एक डोकेदुखी झाली आहे. जेवढा कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते तेवढाच कचऱ्यात वाढ होत राहते. अशा स्थितीत सां जुझे आरियल येथील एक युवक व सिव्हिल इंजिनयर क्लिंटन वाझ याने स्वत:चे व्ही-रिसायकल नावाचे कचरा प्रक्रिया युनिट सुरु केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Engineer Clinton Vaz from San Jose Ariel Starts Sustainable Waste Solution

सासष्टी: राज्यात कचरा व्यवस्थापन एक डोकेदुखी झाली आहे. जेवढा कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते तेवढाच कचऱ्यात वाढ होत राहते. मडगाव पालिकेत देखील कचरा व्हिलेवाट ही एक मोठी समस्या झाली आहे. अशा स्थितीत सां जुझे आरियल येथील एक युवक व सिव्हिल इंजिनयर क्लिंटन वाझ याने स्वत:चे व्ही-रिसायकल नावाचे कचरा प्रक्रिया युनिट सुरु केले आहे.

आपल्या या युनिटमध्ये ४२ मजूर काम करतात. आम्ही दर दिवशी मडगावमधील ५० हजार घरे, परिसरातील सहा पंचायती मिळून जवळ जवळ महिन्याला २०० टन कचऱ्याची विल्हेवाट लावतो असे क्लिंटनने सांगितले. कचरा प्रक्रिया आम्ही लोकांच्या सहकार्याने करू शकतो, असेही क्लिंटन सांगतो.

गोव्यात दर दिवशी ८०० टन कचरा गोळा होतो. यातील जास्तीत जास्त कचरा प्रक्रिया प्लांटमध्ये जातो. ग्रामिण भागात कचऱ्याला आग लावली जाते जे आरोग्यच्या व पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचेही तो सांगतो. गोव्यात २० हजार लोक कचऱ्यापासून आपल्या घरात बारीक सारिक प्रमाणात खत तयार करतात, असे क्लिंटनचे म्हणणे आहे.

कचरा रस्त्याच्या बाजूला किंवा शेतामध्ये फेकली जाते. त्यामुळे होणाऱ्या दुर्गंधी किंवा पसाऱ्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते असेही त्याचे म्हणणे आहे. आपण हे काम जे हातात घेतले आहे ते केवळ कचरा प्रदूषण होऊ नये यासाठी असल्याचे त्याने सांगितले. कचऱ्यापासून होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी केवळ लोकांचेच सहकार्य आवश्यक असल्याचे त्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: कला अकादमी नूतनीकरणाचे काम कृती दलाकडून 'नापास', काय नोंदवले मत वाचा

Snake In Train: झारखंड - गोवा ट्रेनच्या एसी कोचमध्ये आढळला साप, प्रवाशांची पळता भुई थोडी Video

Goa Live Updates: पणजीतील केएफसीला प्रदूषण मंडळाची नोटीस, परवाना मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचा आदेश

Online Cricket Betting: पर्वरीत क्रिकेट सट्टाबाजीचा पर्दाफाश; ५ जणांना अटक, सुमारे लाखभर रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

Diwali 2024: फोव कांडप गेलें मात गोंयान 'परंपरा' जपली!

SCROLL FOR NEXT