पणजी: गोवा राज्यातील यंदाचे काजू उत्पादन हे निम्याने घटल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून हवामान बदलामुळे 2021- 2022 या वर्षात राज्यातील काजू उत्पादन नेमके किती घटेल ? आणि किती उत्पादन शेतकरी यांच्या पदरात पडेल या बद्दलची नेमकी माहिती हाती आली नसली तरी निम्याहून अधिक उत्पादन घटले असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदवल्यामूळे काजू उत्पादक आणि काजू उत्पादनावर अवलंबून असणारा राज्यातील मोठा उद्योगवर्ग चिंतातूर झाला आहे. (Climate change hits Goa cashews; 50 percent reduction in production)
याबाबत तज्ज्ञांनी आपले मत नोंदवताना गोव्यातील काजू उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली असून ही घट नुकत्याच झालेल्या हवामानातील बदल आणि अवकाळी पाऊस यामूळे झाल्याचे स्पष्ट केले. तसेच गोव्यातील काजू उत्पादनातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक नुकसान असून सद्या अवकाळी पाऊस , उच्च तापमान आणि वादळ यामुळे काजूच्या उत्पादनात सरासरी 50 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. काही भागात हे नुकसान यापेक्षा अधिक झाल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
तसेच काही काजूची झाडे अजूनही फुललेली आहेत परंतु त्यांना फळे येतील की नाही याची खात्री नाही. "गेल्या वर्षी गोव्यात 27,366 टन काजूचे उत्पादन नोंदवले गेले होते. आणि यावर्षी ते 50 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे पण खरा आकडा जूनच्या अखेरीस कळेल अशी ही माहिती समोर आली आहे.
याबरोबरच कृषी संचालकांनी याबाबत बोलताना सांगितले कि, अद्याप 50 काजू शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईसाठी विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. या शेतकऱ्यांना “शेतकरी आधार निधी योजनेनुसार'' त्यांना जास्तीत जास्त 40,000 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई देणार आहोत. ते पिकाच्या प्रकारावरही अवलंबून असते. पूर्वी ते 25,000 रुपये प्रति हेक्टर होते ते सध्याच्या सरकारने वाढवले ते म्हणाले.
गोवा काजू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष, रोहित झांट्ये, हे झांट्ये काजूचे भागीदार देखील आहेत, ते बोलतना म्हणाले, “जानेवारीतील पाऊस आणि मार्चच्या मध्यात उच्च तापमानामुळे पीक उशिरा आले आणि या हवामानातील बदलांचा थेट काजू उत्पादनावर परिणाम झाला आहे. आमची एकच आशा आहे की काही काजूची झाडे अजून फुललेली दिसत आहेत पण आम्हाला 20 दिवसांनंतरच उत्पादनाची माहिती मिळेल,” झांट्या म्हणाले.
काजू उत्पादक शेतकऱ्याने यावर बोलताना स्पष्ट केले कि, "यावर्षी सुरुवातीला 120 रुपये प्रतिकिलो दराने चढाओढ होती आणि नंतर स्टॉकच्या कमतरतेमुळे भाव 145 रुपयांवर गेला जो पूर्वीच्या दरापेक्षा कमी आहे." तर काजू शेतकरी संदिप सावंत म्हणाले, “मी सुमारे एक टन काजूचे उत्पादन करायचो, परंतु यावर्षी आमच्याकडे जेमतेम 300 किलोग्रॅम उत्पादन झाले आहे. त्यामूळे सरकार पूरेशी मदत करणार का ? हा प्रश्न काजू उत्पादकांसमोर उभा आहे.
डिचोली येथील शेतकरी, डिस्टिलरी मालकांचे ही मोठे नुकसान झाल्याचं स्पष्ट
डिचोली : बिचोलीम येथील काजू उत्पादक आणि डिस्टिलरी मालकांनी कमी उत्पादनावर चिंता व्यक्त केली आहे. “सामान्यतः, आम्हाला आधीच मजूर मिळतात आणि या वर्षीही आम्ही तेच केले. मात्र, यंदा काजूचे उत्पादन घटल्याने आमचे नुकसान झाले आहे. त्यांच्या वर्षभरात केवळ 20 टक्के उत्पादन होते आणि आम्हाला मजुरांना त्यांची संपूर्ण रक्कम द्यावी लागते”, अशी तक्रार काजू व्यवसायात असलेल्या प्रशांत मालवणकर यांनी केली. अशी काही प्रकरणे आहेत जिथे त्यांनी डिस्टिलरी बसवली आहे परंतु त्यांनी अद्याप ‘उरक’ आणि फेणीचे उत्पादन सुरू केलेले नाही, असे दिनेश मांद्रेकर म्हणाले. “या वर्षी डिस्टिलरीज जवळजवळ कोरड्या पडल्या आहेत आणि काजूचे उत्पादन खूपच कमी आहे. सरकारने काही सबसिडी आणली पाहिजे कारण यावर्षी आमचे मोठे नुकसान होणार आहे,” मांद्रेकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.