Chief Minister Pramod Sawant Twitter/ @ANI
गोवा

पोर्तुगीजांनी तोडफोड केलेल्या मंदिरांचे जतन करु : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

दैनिक गोमन्तक

देशातील राजकारण मागील काही दिवसांपासून मंदिराभोवती फेरा धरत आहे. यातच आता त्याची प्रचिती छोट्याशा गोव्यात देखील येऊ लागली आहे. प्राचीन वास्तू, मंदिरे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आसल्याचे राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी कॉंग्रेसवरही निशाणा साधला. काँग्रेस (Congress) सरकारने प्राचीन मंदिरांची नासधूस करणे थांबवावे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले.

दरम्यान मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ''गोव्यात आम्ही पोर्तुगीजांनी तोडफोड केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी आणि जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्याच्या सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. त्यासाठी आम्ही 20 कोटी रुपये देखील राखून ठेवले आहेत.''

भारतीय संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहचवावी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

भारतीय संस्कृती ही पुरातन संस्कृती आहे. संस्कृतीचे संचित नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज असून, सर्वांनी तसे प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. साईनगर घोगळ येथील साईमंदिरात नूतन साईमूर्तीची प्रतिष्ठापना सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार उल्हास तुयेकर, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade), माजी खासदार नरेंद्र सावईकर व शिर्डी येथे साईबाबा ज्यांच्या घरात राहत होते, त्या कोते-पाटील यांच्या कुटुंबातील वंशज तात्या कोते पाटील खास उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT