Cashew Dainik Gomantak
गोवा

Agriculture News: काजू बागायतदारांसमोर नवं संकट, 'या' समस्येमुळे बिघडतंय आर्थिक गणित

रोठा किडीने बिघडविले आर्थिक गणित : सत्तरीत काजू उत्पादन देणारी जुनी झाडे मरण्याचे प्रमाण चिंताजनक

गोमन्तक डिजिटल टीम

Agriculture News बदलते हवामान, पीक संरक्षणाचे उपाय न करणे, वन्य प्राण्यांचे आक्रमण, पिकाला पोषक वातावरण नसणे, अवेळी पडणारा पाऊस त्यामुळे मागील आठ वर्षांत सत्तरीत काजूचे उत्पन्न घटून मोठी जुनी झाडे मरण्याचे प्रमाण वाढले आहे.

त्यामुळे बागायतदार वर्गाचे काजू पिकाचे आर्थिक गणितही बिघडले आहे. मुख्यत्वे करून सत्तरी तालुक्यात काजू झाडाच्या खोडाला, मुळांना रोठा नावाच्या किडीची लागण होते आहे.

किडीमुळे संपूर्ण झाडाची पाने पिवळी पडून झाड मरून जाते. त्याला जुनी मोठी झाडे बळी पडत आहेत. त्यातच नवीन लागवड केलेली रोपे, कलमांचीदेखील वाढ होत नाही, अशी स्थिती आहे.

काजू पिकावर रोठा कीड ही जास्त नुकसान करीत आहे. खोडाला, मुळाला पोखरून पूर्ण काजू झाड नष्ट करीत आहे. ही संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो आहे.

सत्तरी तालुक्यात पूर्वजांनी डोंगराळ भागात काजू लागवड प्रामुख्याने रोपे लावूनच झाली होती. पण काळानुरूप झालेल्या सर्वच प्रकारच्या बदलांमुळे काजू झाड मरत आहे.

रोपापासून लावलेले प्रत्येक झाड हे गुणधर्माने भिन्न असते. त्यामुळे काजू बियांचा आकार, बोंडूचा रंग व झाडांचा विस्तार हेदेखील भिन्न असतात.

हवामान बदलामुळे घटते उत्पादन

  • काजू मोहोरणे व फळ धरण्याच्या कालावधीत हवामान उष्ण व कोरडे असणे जरूरीचे आहे.

  • मोहोर येण्याच्या कालावधीत ढगाळ हवामान असल्यास काजूवरील ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव वाढून मोहोर जळतो.

  • झाडे मोहोरावर असताना पाऊस पडल्यास पिकांवर अनिष्ट परिणाम होतो.

  • फळाची वाढ होत असताना अचानक जास्त तापमान वाढल्यास (४० ते ४२ अंश सें.ग्रे.) फळाची गळती मोठ्या प्रमाणात होते.

उपाययोजनांविषयी माहिती

वाळपई कृषी विभागीय कार्यालयातर्फे वेळोवेळी काजूविषयी समस्या, उपाययोजना यांची माहिती लोकांना दिली जाते.

विविध कृषी मेळावे, प्रदर्शन यांच्या माध्यमातून सत्तरी तालुक्यात अनेक ठिकाणी काजू लागवड, खत व्यवस्थापन, रोग, किडी उच्चाटन याविषयी सांगितले जाते. ते लोकांनी कृतीद्वारे आपल्या बागायतीत आचरणात आणले पाहिजे.

काजू पिकास आम्लधर्मीय जमीन मानवते. सत्तरीत सध्या वेंगुर्ला ४, वेंगुर्ला ७ या जाती प्रचलित झालेल्या आहेत. गोव्यात बाळ्ळी, धावे अशा जाती प्रचलित आहेत. रोग, कीडी यांचा नायनाट करण्यासाठी औषधोपचार गरजेचे आहेत.

- विश्वनाथ गावस, कृषी अधिकारी, वाळपई

काजूची मोठी झाडे चांगले उत्पादन देतात. सध्याच्या काळात बदलते वातावरण, अवेळी पाऊस, रानटी प्राण्यांचे आक्रमण यांमुळे काजू झाडांवर अनिष्ट परिणाम होतो आहे. रोठा किडीमुळे नगरगाव पंचायत भागातील विविध गावात काजू झाडांना ग्रासलेले आहे.

- संजय केळकर, धावे-सत्तरी

मासोर्डे गावात काजू पिकांची बागायत पूर्वजांनी वसविली होती. मागील दोन-चार वर्षांत मात्र बियांना चांगला दर मिळालेला नाही. यावर्षी १२३ वरून घसरत १२०, ११८, ११५, ११६ असा दर वर-खाली होत आहे. किमान दोनशे रुपये दर गरजेचा आहे. रोग, किडीमुळे त्रस्त असलेला बागायतदार कमी दरामुळे अधिकच भरडला जातो आहे.

- म्हाळू गावस, मासोर्डे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: गोवा नाईट क्लब आग प्रकरण! दोषींवर कठोर कारवाई होणारच; मुख्यमंत्री सावंत आक्रमक

बेळगावचे विभाजन होणार? नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी; अधिवेशनात चर्चा

Goa Live Updates: 'इंडिगो संकटा'तही दाबोळी विमानतळाचे सुरळीत कामकाज; वाढीव कर्मचारी, गर्दी व्यवस्थापन आणि MoCA कडून कौतुक

Goa Tourism: सुट्टीसाठी गोव्यात चाललाय? 'Akshaye Khanna'ने शुटींग केलेली एकमेव जागा पाहा; 24 वर्षांनंतरही पर्यटक करतात तुफान गर्दी

Video: 36 वर्षांपूर्वी लाहोरमध्ये विनोद खन्नांनी केलेली 'ती' स्टेप; अक्षय खन्नाचा FA9LA डान्स वडिलांची 'Copy'?

SCROLL FOR NEXT