Illegal Water Sports
Illegal Water Sports Dainik Gomantak
गोवा

Illegal Water Sports : क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जलसफारी करणाऱ्या बोट ऑपरेटरवर गुन्हा दाखल

दैनिक गोमन्तक

Illegal Water Sports : गोव्यात जलक्रीडा करण्यासाठी अनेक पर्यटक दाखल होत असतात. पण यादरम्यान अनेक अपघातही घडताना आपल्याला दिसून येतात. बऱ्याचदा अति लाभाच्या हव्यासापोटी ते जलक्रीडा करण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा बोटीमध्ये भडिमार करतात.

पर्यटन विभागाकडून बोट ऑपरेटरना काही नियमावली देण्यात आलेली असते. मात्र याचे पालन होताना दिसत नही. अशीच एक घटना म्हणजे बायणामध्ये असलेल्या बॅट आयलंडवर बोटीच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीमध्ये भरले असल्याचा प्रकार उघड झाला असून पोलिसांनी संबंधित बोट ऑपरेटरला ताब्यात घेतले आहे.

एम व्ही श्री रेणुका - 1 या जलक्रीडा बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे हार्बर पोलिसांनी बोटच्या तिघांवर कारवाई करत गुन्हा नोंद केला आहे.

दरम्यान, मीरामार आणि केरी समुद्रकिनारे पर्यटन विभागाकडून बोट राइड आणि डॉल्फिनस्पॉटिंग ट्रिप या जलक्रीडांसाठी निश्चित करण्यात आलेले आहेत. जेट स्की राईड, फ्लॅटेबल बनाना आणि बंप राइड्स, विंच पॅरासेलिंग, आयलंड ट्रिप, कयाकिंग आणि स्टँड-अप सर्फ बोट्सना केरी समुद्र किनारी परवानगी देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Show Cause Notice: सात दिवसांत स्पष्टीकरण द्या! बेकायदा शुल्क आकारणी प्रकरणी मुष्टिफंड हायस्कूलला नोटीस

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला; परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन नंबर जारी

Pakistan Road Accident: पाकिस्तानातील पंजाबमध्ये भीषण अपघात; 5 मुलांसह एकाच कुटुंबातील 13 जणांचा जागीच मृत्यू

Taxi Driver Assault: कळंगुट येथे मद्यधुंद पर्यटकांचा स्थानिक टॅक्सीचालकावर हल्ला, पाचजण ताब्यात

Goa Monsoon 2024: आनंदवार्ता! गोव्यात पाच जूनला मॉन्सून हजेरी लावणार

SCROLL FOR NEXT