Calangute
Calangute  Dainik Gomantak
गोवा

Calangute News : आसगाव, बादे, शापोरा भागांत पाणी समस्या; कायमस्वरूपी तोडगा काढा

गोमन्तक डिजिटल टीम

Calangute News :

कळंगुट, उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करणाऱ्या लोकांची राज्यात तशी कमतरता नाही; परंतु उन्हाळा असो अथवा पावसाळा वर्षाचे बाराही महिने पाण्यासाठी वणवण करणाऱ्यांना बघायचे असेल तर बार्देशातील आसगाव-बादे तसेच शापोरातील ग्रामस्थांना भेटा, म्हणजे त्यांची व्यथा तुम्हाला समजेल.

गोवा मुक्तीच्या सुवर्णपूर्तीनंतरही या भागातील शेकडो ग्रामस्थ दरदिवशी पाण्यासाठी आंदोलन करतात, घरातील भांडी-कुंडी घेऊन म्हापशाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात धडक देतात,

ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. आसगाव पंचायत क्षेत्रातील आसगाव-बादे तसेच हणजूण-कायसूव क्षेत्रातील वागातोर-शापोरा येथील परिसर पर्यटन क्षेत्रात मोडला जातो; परंतु दरवर्षी राज्य सरकारला लाखो रुपयांचा पर्यटन कर देणाऱ्या या भागातील लोकांना तसेच व्यावसायिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सरकारवर नव्हे तर पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खासगी टँकरवाल्यांवर अवलंबून राहावे लागते, ही येथील सध्याची कटू स्थिती आहे.

दरम्यान, शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी येथील परिस्थितीचा आढावा घेत सोनारखेड-आसगाव पठारावर ६.५ एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत नुकतीच पायाभरणी केली आहे. येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत हा प्रकल्प कार्यान्वित होताच या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची मिटणार असल्याचे आमदार दिलायला लोबो यांनी लोकांना आश्वासन दिले आहे.

शिवोली मतदारसंघात आसगाव-बादे, हणजूण-कायसूव, मार्ना-शिवोली, सडये-शिवोली, ओशेल-शिवोली तसेच काणका-वेर्ला या एकूण सहा पंचायतींचा सहभाग आहे. आसगाव-बादे तसेच शापोरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न विद्यमान आमदार दिलायला लोबो यांनी लवकरात लवकर मिटवून या भागातील शेकडो ग्रामस्थांना दिलासा देण्याची जोरदार मागणी होत आहे.

एकवेळ आपण जेवण टाळू शकतो; परंतु पाण्याविना जीवनाची कुणी कल्पनाच करू शकत नाही. हणजूण-कायसूव पंचायत क्षेत्रातील शापोरात अथांग पाण्याने भरलेला महाकाय समुद्र आहे. त्याच्याउलट पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांची दिवसरात्र होणारी ससेहोलपट असे परस्पर विरोधी चित्र याभागात वर्षाचे बाराही महिने पाहावयास मिळते.

- प्रताप विर्णीकर, ग्रामस्थ

या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या नवीन नसून आतापर्यंत पाण्यासाठी या भागातील लोकांनी अनेक आंदोलने केली आहेत. आसगावात होऊ घातलेल्या कमी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाने येथील पाण्याचा प्रश्न तात्पुरता मिटेल खरा; परंतु आसगाव-बादेवासीयांची पाण्याची समस्या भविष्यात कायमची सुटेलच या गोष्टीची शाश्वती वाटत नाही.

- रवी हरमलकर, सामाजिक कार्यकर्ता

स्थानिक लोक आपल्या वडिलोपार्जित जमिनी सहजतेने दिल्लीकरांना विकत आहेत. या गोष्टीला पंचायत आळा घालू शकत नाही; परंतु नळाच्या जोडण्या देताना पंचायत मंडळ सर्वप्रथम स्थानिक लोकांचाच विचार करते. गेल्या वर्षभरात कुणाही परप्रांतीय बिल्डरला नळाच्या जोडण्यांचा परवाना पंचायतीकडून देण्यात आलेल्या नाहीत.

- हनुमंत नाईक, सरपंच, आसगाव

आसगावात आमचा लाकूड वखारीचा व्यवसाय आहे. वखारीत अंदाजे पस्तीस ते चाळीस फूट खोल आमची स्वत:ची विहीर असून पावसाळा सोडल्यास आतापर्यंत एकदाही येथील विहिरीत पाणी पाहिलेले नाही. वखारीत नळाच्या जोडण्या जोडलेल्या आहेत. बिलेही वेळेत येतात; परंतु शून्याच्या पलीकडे जात नाहीत. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

- रमेश साळगावकर, व्यावसायिक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

Goa Todays Live Update: म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील हालचालीवर येणार निर्बंध; बीचच्या धारण क्षमतेचा NIO करणार अभ्यास

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; सक्तीच्या नसबंदीला बळी पडलेल्यांना मिळणार नुकसान भरपाई; सरकारला आदेश

SCROLL FOR NEXT