Bombay HC At Goa Dainik Gomantak
गोवा

हणजूणच्या सचिवांकडून न्यायालयाची दिशाभूल; 38 बेकायदेशीर बांधकामे आठवड्यात पाडण्याचे कोर्टाचे आदेश

पंचायत संचालकांनी न्यायालयात येऊन सचिवांवर काय कारवाई करणार? याची माहिती द्यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Pramod Yadav

Anjuna Illegal Construction: हणजूणच्या किनारी भागात बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेली 38 बांधकामे एका आठवड्यात पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज (दि.22) दिले.

दरम्यान, बेकायदेशीर बांधकामं पाडण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र हणजूणच्या सचिवांनी यापूर्वी सादर केले होते. पण बांधकामं तशीच असल्याचे पुराव्यासह न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने दिशाभूल केल्याचे प्रकरण न्यायालयाने गांभीर्याने घेतले आहे.

हणजूण किनाऱ्यावरील 38 बेकायदेशीर बांधकामे बार्देशच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी एका आठवड्यात जमीन दोस्त करावी आणि कृती अहवाल सादर करावा असे आदेश न्यायालयाने हणजूणचे सरपंच, सचिव, नगरनियोजन खात्याचे अधिकारी, जीसीझेडएमए यांना दिले आहेत.

तसेच, बांधकाम पाडल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी पंचायतीचे सचिव जितेंद्र नाईक आणि माजी सचिव धर्मेंद्र गोवेकर यांना 31 जानेवारीपूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करावे.

पंचायत संचालकांनी 31 जानेवारीला न्यायालयात येऊन सचिवांवर काय कारवाई करणार? याची माहिती द्यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT