Goaykarache ghar
Goaykarache ghar 
गोवा

भाजपला गोव्यात पुन्हा राज्य करू देणार नाही ः विजय सरदेसाई

Dainik Gomantak

मडगाव

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजप पक्ष आपल्यासाठी मृतवत झाला असून भाजपला गोव्यात पुन्हा राज्य करू देणार नाही व त्यासाठी सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणार असल्याचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले. आपला सन्मान राखून आगामी निवडणुकीत समविचारी पक्षांशी हातमिळवणी करण्यास तयार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरदेसाई यांच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दवंडे - फातोर्डा येथे ‘गोंयकाराचे घर’ या नवे नेतृत्व घडवणाऱ्या वास्तूचे जयवंतराव सरदेसाई यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार जयेश साळगावकर, आमदार विनोद पालयेकर, मडगावच्या नगराध्यक्ष पूजा नाईक, माजी नगराध्यक्ष डॉ. बबिता प्रभुदेसाई, उपनगराध्यक्ष टिटो कार्दोझ, नगरसेवक ग्नेल आंद्राद, लिंडन परेरा, गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष अकबर मुल्ला, दुर्गादास कामत, डॉ. रेणुका डिसिल्वा, प्रवक्ते प्रशांत नाईक, सरचिटणीस मोहनदास लोलयेकर, महिला गोवा फॉरवर्डच्या अध्यक्ष आस्मा सईद, गोवा युवा फॉरवर्डचे अध्यक्ष राज मळीक, गोवा फॉरवर्डचे नेते राजेश वेरेकर, संतोषकुमार सावंत, जगदीश भोबे यावेळी उपस्थित होते.
गोंयकारवादी शक्तींना एकत्र करून गोव्याला नवी दिशा देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे, असे सरदेसाई यांनी पुढे सांगितले. जास्त संख्येने नव्हे पण गोवा फॉरवर्डचे आमदार निवडून आणले. भविष्यातही आम्ही याच पद्धतीने पुढे जाणार आहोत. पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजप आमच्यासाठी मृतवत ठरला याचा मी पुनरुच्चार करत आहे. यापुढे गोव्यात भाजपला पुन्हा राज्य करू देणार नाही. त्यासाठी लोकांना एकत्र करून पुढे जाणार आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.
म्हादई प्रकरणी गोव्याची फसवणूक केलेले केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्यातील वनसंपदा नष्ट करण्याचा घाट घातला आहे. गोव्यातील वनसंपदा नष्ट करणारे तीन मोठे प्रकल्प वन व पर्यावरण मंत्रालयाने मंजूर केले आहेत. टाळेबंदीच्या आड खनिज वाहतूक केल्याचा आरोपही सर्वांनी भाजपवर केला होता, असे सरदेसाई यांनी सांगितले.
गोव्यातील सरकार अकार्यक्षम असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे ह्रदय गोयकारवादी नाही. त्यांच्या हातात गोवा सुरक्षीत नाही. ‘गोंयकाराचे घर’ ही वास्तू गोंयकारवादी शक्तींना एकत्र आणून गोव्याला नवी दिशा देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Goa Goa Goa Goa Goa

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Richest Candidate Pallavi Dempo: पल्लवी धेंपे तिसऱ्या टप्प्यात देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार

Goa Today's Live News: भाजपला सत्तेतून हटविण्याची वेळ आलीय - मिकी पाशेको

Harmal News : डबल इंजीन सरकारमुळेच विकास : दयानंद सोपटे

Lok Sabha Elections 2024: वोट फॉर काँग्रेस; दिल्लीत यासिन मलिकसोबत मनमोहन सिंग यांचे पोस्टर कोणी लावले?

सोनीनं लॉन्च केलं फ्युचरिस्टिक 'वेअरेबल एअर कंडिशनर' गॅझेट! जाणून काय आहे खासियत

SCROLL FOR NEXT