goa police staff.jpg
goa police staff.jpg 
गोवा

Goa: गोमेकॉतुन पळवलेले 'ते' बाळ अखेर सापडले; पोलीसांच्या प्रयत्नांना यश

दैनिक गोमंतक

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून अपहरण केलेल्या बाळाची पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. शुक्रवारी पळवण्यात आलेल्या या बाळ शनिवारी सालेलीत सापडले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि जनतेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी या बाळाला यशस्वीरित्या शोधून काढले आहे. पोलिसांनी संशयित महिलेला देखील ताब्यात घेतले असून, त्या महिलेला डिचोली पोलीस ठाण्यात हलवण्यात आले आहे. (baby kidnapped from Goa medical college was finally found)

बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळाच्या आवारातून एक महिन्याच्या बाळाचे अपहरण केलेली संशयित महिला ही अस्नोड्यापर्यंत बाळ घेऊन गेल्याची माहिती सीसीटीव्ही कॅमेरातून पोलिसांना मिळाली होती. मात्र त्यापुढे पोलिसांना तपासाची दिशा मिळण्यात दुपारपर्यंत यश आले नव्हते. ती महिला डिचोली परिसरातील असण्याच्या संशयावरून पोलिस पथके त्या महिलेचा शोध घेत होती. मात्र नंतर सालेली या दुर्गम भागात ते मूल नेल्याची माहिती मिळाली आणि पोलिस त्या घरापर्यंत पोचले. मुळ पळवणारी महिला आणि बाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लहान मुले पळविणाऱ्या टोळीशी ही महिला संबंधित असण्याची शक्यता कमी आहे. तिने गोमेकॉ इस्पितळ आवारातून बाळ घेऊन पसार झाल्यानंतर अस्नोडापर्यंत मोटारसायकल पायलट, प्रवासी बस, तसेच एका दुचाकीकडे लिफ्ट घेऊन करासवाडापर्यंत प्रवास केला. एखादी टोळी या प्रकरणात असती तर तिने ते बाळ घेऊन प्रवास केला नसता. या महिलेच्या वर्णनावरून ती सुशिक्षित दिसते. त्यामुळे हे बाळ घेऊन पसार होण्यामागील हेतू काय असू शकतो याचाही तपास केला गेला. ही घटना घडली व त्यानंतर तपास सुरू होऊन तिचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामार्फत शोध घेण्यात बराच वेळ गेला. शुक्रवारी संध्याकाळी ती करासवाडा येथे बाळासोबत दिसली होती. त्यामुळे पोलिसांनी रात्रभर करासवाडा व त्या आजाबाजूचा परिसर पिंजून काढला. त्यानंतर अस्नोडा येथे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ती दिसली होती. मात्र त्यानंतर ती कोठे गेली याची माहिती पोलिसांना मिळाली नसल्याने तपासकामाची गती काहीशी मंदावली होती तिला आज दुपारनंतर खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर गती आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाचे अपहरण करून तिने गोमेकॉ इस्पितळाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर नेहमीपणे उभ्या असलेल्या मोटारसायकल पायलटला माशेल येथे जायचे आहे, असे सांगितले. चालकाने तिला ३०० रुपये लागतील, असे सांगितल्यावर इतके पैसे माझ्याकडे नाहीत. त्यामुळे पणजी बसस्थानकापर्यंत पोहोचविण्यास सांगितले. बसस्थानकावर पोहोचल्यावर तिने पुन्हा मोटारसायकल पायलटने म्हापसा येथे जाण्यास निघाली. मात्र पैसे कमी असल्याने पर्वरी येथेच सोडण्यास सांगितले. तेथून ती बसने म्हापसा येथील बसस्थानकाजवळ असलेल्या सर्कलवर उतरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. त्यापुढील तपास पोलिसांनी खबऱ्यांच्या आधारे केला. 

Goa: कुंडई खूनप्रकरणी पोलिस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी घेतला आढावा
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

१) पोलिसांचा मोठा फौजफाटा शुक्रवारी रात्री म्हापसा पोलिस स्थानकावर तैनात करून पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी पोलिस अधिकाऱ्यांना कामे बजावली. त्यानंतर ही महिला करासवाडा येथे दुचाकी चालकाकडून लिफ्ट घेऊन गेल्याचे करासवाडा येथील परिसरातील एका आस्थापनाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसली. त्यामुळे रात्रभर त्या भागात झडती घेतली. मात्र काही हाती लागले नव्हते. आज दुपानंतर मात्र पोलिसांना अचूक माहिती मिळत गेली व तपासकामाला गती आली.
२) पोलिसांनी आतापर्यंत चोरीला गेलेल्या बाळाचे, तसेच त्यांच्याकडे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज कोणालाच दिले नव्हते. हे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. खरे म्हणजे पोलिसांनी ते सोशल मीडियावर व्हायरल करून जनतेला आवाहन करायला हवे होते त्याची चर्चा आता रंगली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT