Smart Signals in Goa
Smart Signals in Goa Dainik Gomantak
गोवा

Smart Signals in Goa : वाहतुकीवर स्वयंचलित कॅमेऱ्यांची करडी नजर

दैनिक गोमन्तक डिजिटल

Smart Signals in Goa : राज्यात सातत्याने रस्ता अपघातांत होणारी वाढ, दिवसेंदिवस वाढलेले अनियंत्रित वाहतुकीचे प्रमाण, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांमध्ये पडणारी भर ही चिंताजनक आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा व वाहतूक पोलिसांनी राज्यभर वाहनचालकांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.

दरदिवशी नियमांचे पालन न केलेल्या सुमारे 2 हजारांपेक्षा अधिक वाहनचालकांना दंड दिला जात आहे तसेच हेल्मेटची स्ट्रीप न लावणाऱ्यांना थांबवून त्याचे महत्त्व पोलिस पटवून देत आहेत.

सध्याच्या सिग्नल्समध्ये बदल करून स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत स्वयंचलित हायटेक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे व स्मार्ट सिग्नल्स बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर हे अत्याधुनिक यंत्रणा नजर ठेवणार आहे.

उत्तर गोव्यात म्हापसा व पेडणे येथे ही मोहीम झाल्यानंतर आज पणजीतील मल्टिपार्किंग इमारतीजवळ ही मोहीम सुरू करण्यात आली. पणजीतच सायंकाळी 4 वाजता सुरू झालेल्या या मोहिमेत सुमारे 400 हून अधिक दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना नियमांचे पालन न केल्याप्रकरणी दंड देण्यात आला.

हेल्मेट न वापरणे, गाड्यांच्या काळ्या काचा, सीट बेल्ट न लावणे, वाहनांची क्रमांकपट्टी याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. पणजीचे वाहतूक व स्थानक पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई रात्री 8 वाजेपर्यंत सुरू होती.

स्मार्ट सिग्नल्स

सध्याच्या सिग्नल्समध्ये बदल करुन स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत स्मार्ट सिग्नल्स बसविण्यात येणार आहेत. सिग्नल्सवर बसविलेलेट हायटेक कॅमेरे हे फक्त वाहतुकीवर नजर ठेवणार नाहीत तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरदेखील त्यांची नजर असणार आहे. यासाठी स्मार्ट सिटीचा खास कंट्रोलरुम उभारला आहे.

येथूनच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. येथे वाहतूक पोलिसांना बसण्यासाठी खास आसनव्यवस्था असणार आहे. ही नवी प्रणाली मार्चपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलिस अधीक्षक बोसुएट सिल्वा यांनी दिली.

ही मोहीम राज्यभर विविध ठिकाणी पुढील काही दिवस सुरूच राहणार आहे. ही मोहीम दंडामधून महसूल गोळा करण्यासाठी नसून वाहनचालकांना नियमांची शिस्त व सवय लागावी यासाठी आहे. हेल्मेट व सीट बेल्ट घालणे हे त्यांच्या सुरक्षिततेसाठीच आहे हे पटवून दिले जात आहे. हेल्मेट हे किमान चालकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी ते वापरावे.

- निधीन वाल्सन, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

Margao News : मतदानाला प्रेरित करण्‍यास पॅरा ग्‍लायडर्सचा वापर : आश्‍वीन चंद्रू

Heavy Rainfall in Brazil: ब्राझीलमध्ये पावसाचा कहर, दक्षिणेकडील राज्यात 10 जणांचा मृत्यू; राज्यपालांनी दिला आपत्तीचा इशारा

Goa Loksabha Election: ‘सायलंट’ मतदार दाखवणार करिष्मा; फोंड्यात ‘गोमन्तक-टीव्ही’ महाचर्चा

Margao District Hospitals : जिल्हा रुग्णालयाचे खासगीकरण रद्द करणार : विरियातोंचे आश्वासन

SCROLL FOR NEXT