Goa Traffic Issue: राज्यात मोठ्या प्रमाणात येणारा पर्यटकांचा लोंढा वाढत आहे. रस्त्यावर जागोजागी वाहतुकीची कोंडी होत आहे. राज्याच्या मुख्य शहरात म्हणजेच पणजीमध्ये दिवसेंदिवस ही समस्या वाढत आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांची प्रमुख पसंती ही किनारी भागाला असते. मात्र मागील काही वर्षात पणजीतही पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे.
तर दुसरीकडे, दिवस रात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने उभी केल्यानेही वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात वाहतूक पोलिसांची आधीच संख्या कमी असल्याने या समस्येत आणखी भर पडत आहे. मुख्यमंत्र्यांनी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस व आरटीओचा कृती आराखडा तयार असल्याचे सांगितले; मात्र अजूनही हा आराखडा गुलदस्त्यातच आहे.
पोलिसांनी तो आरटीओकडे पाठवला आहे मात्र त्यावर अंतिम निर्णय घेण्यास विलंब होत आहे. गर्दी वाढत आहे मात्र रस्त्यावर पोलिसांची उपस्थिती क्वचितच दिसत आहे. पोलिसांबरोबर वाहतूक अधिकाऱ्यांची तेवढीच जबाबदारी आहे; मात्र ते कधी रस्त्यावर रात्रीच्या वेळी दिसतच नाहीत.
त्यांच्याकडे मनुष्यबळ नसल्याचे सबब देऊन वेळ मारून नेण्याचे प्रकार प्रत्येक वर्षी घडत आहेत. दरवर्षी कृती आराखड्याप्रमाणे काहीच होत नाही प्रसंगानुसार पोलिसांना निर्णय घ्यावे लागतात या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या सनबर्नमुळे उत्तर गोव्यातही वाहतूक कोंडी सोडवताना मात्र पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.