गोवा-दमणचे आर्चबिशप फिलिप नेरी फेर्रांव यांची फेडरेशन ऑफ एशियन कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स (FABC) च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
म्यानमारमधील कॅथलिक चर्चचे प्रमुख सेलेशियन कार्डिनल चार्ल्स मुआंग बो यांचा आशियाई चर्चचे प्रमुख म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ येत्या जानेवारी 2025 मध्ये पूर्ण होत आहे.
थायलंडची राजधानी बँकॉक येथे FABC केंद्रीय समितीच्या तीन दिवसीय बैठकीच्या शेवटच्या दिवशी (22 फेब्रुवारी) निवडणूक पार पडली.
याच बैठकीत फिलीपिन्समधील कलुकन येथील बिशप पाब्लो व्हर्जिलियो सिओंगको डेव्हिड यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. डेव्हिड यांची कोलंबो, श्रीलंकेचे आर्चबिशप कार्डिनल माल्कम रणजीत यांच्या जागी निवड झाली आहे.
टोकियो, जपान येथील सेलेशियन आर्चबिशप टार्सिसियो इसाओ किलकुची यांची फेडरेशनच्या सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे.
कार्डिनल फेर्रांव सध्या कॅथोलिक बिशप ऑफ इंडिया (CCBI) च्या परिषदेचे अध्यक्ष आहेत. फेर्रांव यांनी FABC ऑफिस ऑफ एज्युकेशन अँड फेथ फॉर्मेशनमध्ये अध्यक्ष म्हणून काम केले आहे.
कार्डिनल फेर्रांव यांचा जन्म 20 जानेवारी 1953 रोजी म्हापसा, गोवा येथे झाला. तीन भावंडांमध्ये ते सर्वात लहान होते.
अवर लेडी, साळगाव-पिळर्ण, गोवा येथे त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे पुण्यात पोपल सेमिनरी येथे तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्राचा अभ्यास केला. 28 ऑक्टोबर 1979 रोजी त्यांची फादर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.