Billboards  Dainik Gomantak
गोवा

सूचनाफलकावरील जाहिराती कायदेशीर की बेकायदेशीर?

खंडपीठाने मागितले महापालिकेकडे स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

पणजी : रस्त्याच्या बाजूने असलेल्या सूचनाफलकावरील जाहिराती बेकायदेशीर की कायदेशीर यासंदर्भात पणजी महापालिकेने स्पष्टीकरण करण्याचे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्वेच्छा याचिकेवरील सुनावणी चार आठवड्याने पुढे ढकलली आहे. रस्त्याच्या बाजूने मोठमोठे जाहिरातीचे होर्डिंग्समुळे वाहन चालकाचे लक्ष विचलित होऊन अपघाताला कारणीभूत होत असल्याने गोवा खंडपीठाने पंधरा वर्षापूर्वी ही स्वेच्छा याचिका घेतली होती.

या स्वेच्छा याचिकेत गोवा खंडपीठाने नियुक्त केलेल्या ॲमिक्यूस क्युरींनी रस्त्याच्या बाजूने पणजीत मोठ्या प्रमाणात कसिनोचे फलक उभारण्यात आले आहेत. या फलकामुळे वाहन चालकांबरोबरच पर्यटकांचेही लक्ष वेधून घेतले गेले जात असल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडीचे प्रकार घडतात. अजूनही राष्ट्रीय, राज्य व जिल्हा महामार्गावरील रस्त्याच्या बाजूने मोठमोठे जाहिरातीचे होर्डिंग्य उभे राहिलेले आहेत. संबंधित क्षेत्रातील पंचायत व पालिकांनी त्याविरुद्ध कारवाई करण्याची गरज असूनही काहीच होत नाही. रस्त्याच्या बाजूने वाहतूक सूचनाफलक तसेच बेरिकेडस् याच्यावर काही जाहिरातीचा समावेश होतो त्यामुळेही वाहन चालकांचे लक्ष विचलित होणे स्वाभाविक आहे. राज्यातील विविध भागातून सुमारे ५००० पेक्षा अधिक लहान मोठे जाहिरातींचे होर्डिंग्स हटवण्यात आले असले तरी पुन्हा तेथे नव्याने होर्डिंग्स उभारले जात आहेत. रस्त्याच्या कडेपासून 40 मीटर अंतरात कोणत्याही प्रकारचे होर्डिंग्स उभारण्यास बंदी आहे तरी त्याचे उल्लंघन होत असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

पंचायत व नगरपालिका आपल्या परिसरात बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या होर्डिंग्सविरुद्ध कारवाई करत असली तरी त्यांना दंड ठोठावण्यात येत असल्याने पुन्हा हे होर्डिंग्स उभारण्यास येतात. मांडवी नदीच्या किनारी भागात जाहिरातीचे फलक आहेत. त्यामध्ये नदीच्या पात्रात उभ्या असलेल्या कसिनो बोटीवरील झगमगाटात असलेल्या त्यांच्या जाहिरात फलकामुळे रस्त्यावर लोकांची गर्दी होती. त्यामुळे वाहन चालकांचीही कोंडी होते. कॅसिनोच्या प्रवेशद्वारावरही मोठे फलक असल्याची खंडपीठाला माहिती देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT