Goa Accident News
Goa Accident News  Dainik Gomantak
गोवा

वशालबाग धारगळ येथे चारचाकीची ट्रकला धडक; तिघे जखमी

दैनिक गोमन्तक

आज सकाळी पहाटे पाच वाजता वशालबाग धारगळ येथे फाॅर्च्युनर गाडी व उभा करून ठेवलेला ट्रक यांच्यात पाठीमागून जोरदार धक्का ट्रकच्या पाठीमागे दिल्यामुळे फाॅर्च्युनर गाडीतले तिघे जखमी, फाॅर्च्युनरगाडी कळंगुट बागाहून ओरोस कुडाळ येथे जात होती या गाडी मध्ये एकूण पाच जण होते, गाडीचा ताबा गेल्यामुळे ट्रकला पाठीमागे जोरदार धक्का दिला.

ही घटना अग्निशामक दलाला मिळतातच अग्निशामक दलाचे सहायक अधिकारी आणि जवान यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. फाॅर्च्युनर गाडीमधले तिघे बाहेर सरले होतेच तर दोघे गाडी मध्ये अडकून पडले. त्यात गाडी चालवत असलेला हिमांशू ड्राइवर सीट वर स्टेअरिंग मध्ये अडकला होता.

जवानांनी स्टेअरिंग व सीटचा भाग अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून हिमांशूला बाहेर काढण्यात आले. तत्पूर्वी सीटच्या पाठीमागे बसलेल्या विक्रमला बाहेर काढून अजीलो हॉस्पिटल म्हापसा येथे पाठवण्यात आले.

नंतर हिमांशू याला जखमी अवस्थेत अजीलो हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले. फाॅर्च्युनर गाडी क्रमांक MH-07-Q-9005 ह्यागाडीने ट्रक क्रमांक GA-03-T-7284 चालक अरुण साळगावकर हा ट्रक घेऊन अस्नोडा येथून साटेली येथे जात होता. फाॅर्च्युनर गाडीमध्ये हिमांशू, रौनक देसाई, सागर, विक्रम आणि तन्मय खानोलकर हे ओरोस येथे जात होते.

अग्निशामक शामक दलाने आपल्या उत्कृष्ट शैलीचा वापर करून हिमांशू आणि विक्रम याला गाडीतून बाहेर काढण्यात आले. यात अग्निशामक दलाचे सहायक अधिकारी प्रशांत धारगळकर, यांच्या नेतृत्वाखाली हवालदार प्रदीप असोलकर चालक प्रमोद गवंडी, जवान अमोल परब, जवान अमित सावळ, जवान संदेश पेडणेकर, जवान विकास चौहान, जवान राजेश परब जवान यशवंत नाईक यांनी शिस्तबद्धतीने जखमीला बाहेर काढण्यात यश मिळवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

SCROLL FOR NEXT