Aasgao Gram Sabha Dainik Gomantak
गोवा

Aasgao Gram Sabha : आसगाव ग्रामसभेत ‘त्या’ व्हिडिओवरून गोंधळ!

सरपंच आक्रमक : संबंधितांना सुनावले खडे बोल

गोमन्तक डिजिटल टीम

Aasgao Gram Sabha : आसगाव ग्रामसभेत रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाशी संबंधित तरुणांच्या गटाच्या कथित व्हिडिओवरून रविवारी काहीसा गोंधळ पाहायला मिळाला. तसेच, समाज माध्यमांत त्यांच्याकडून पंचायत सदस्यांविरुद्ध अपमानास्पद भाषेचा कथित वापर होत असल्याने आसगावचे सरपंच हनुमंत नाईक यांनीही या गटास अपमानास्पद भाषा खपवून घेणार नसल्याचे सुनावले.

यावेळी ग्रामस्थांनी विविध प्रश्न उपस्थित केले. ज्यात एका बिल्डकरकडून मंदिराजवळील तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यात अडथळा निर्माण करणे, रस्त्यांवरील खड्डे, रस्त्यालगतचे पार्किंग आदी मुद्द्यांवरून ग्रामस्थांनी पंचायतीला खडे बोल सुनावले.

समाज माध्यमांत फिरत असलेल्या एका व्हिडिओचा संदर्भ देत माजी पंच नाईक म्हणाले की, व्हिडिओ तयार करण्यात सहभागी असलेल्यांनी पंचायत उपसमित्यांच्या काही सदस्यांविरुद्ध तसेच पंचायत मंडळाच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरली आहे.

गावातील समस्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओ तयार करताना वापरल्या गेलेल्या असंसदीय शब्दांवरही अनेक ग्रामस्थांनी आक्षेप घेतला.

एखाद्या समस्येवर आवाज उठविणे चांगली बाब असते. परंतु, अपमानास्पद भाषेचा वापर अयोग्य आहे. त्यामुळे या प्रकरणात गुंतलेल्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करणे आवश्यक असल्याचे नाईक म्हणाले.

आसगावचे सरपंच हनुमंत नाईक म्हणाले की, काही लोक गावाचे नाव बदनाम करण्यासाठीच बाहेर पडलेत. ते म्हणाले की, पंचायत मंडळाचे लक्ष न वेधताच परस्पर ‘आरजी’ समर्थित सदस्यांकडून अनेक व्हिडिओ क्लिप, फोटो आदी प्रसारित केले जाताहेत. पंचायतीच्या निदर्शनास आणून न देताच समाज माध्यमांत मुद्दे अधोरेखित करणे हे योग्य नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही गतिरोधक, नियमित पाणीपुरवठा करणे, रस्त्यालगतची झुडपे कापणे, नाले साफ करणे आदी कामे सातत्याने अधोरेखित केली जाताहेत. परंतु, ‘साबांखा’कडून कोणतीही कार्यवाही होत नाही. यातील बहुतांश कामे ही पंचायत निधीतून होतात.

हनुमंत नाईक, सरपंच आसगाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

ट्रॉलर्स मालकांचे आंदोलन! बंदी असताना नियमांचे उल्लंघन; पारंपरिक मच्छीमारांवर बेकायदेशीर मासेमारीचा आरोप

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT