Mandovi Accident Dainik Gomantak
गोवा

Mandovi Accident: ओव्हरटेकच्या नादात कारची दुचाकीला धडक, चालक मांडवी पुलावरुन पडला नदीत

Pramod Yadav

Mandovi Accident

पणजीतील मांडवी पुलावर सायंकाळी दुचाकी आणि चारचाकी यांच्यात अपघात झाला आहे. यात ओव्हरटेक करण्याच्या नादात कारची धडक बसल्याने दुचाकी चालक पुलावरुन मांडवी नदीत पडला.

नदीत पडलेला दुचाकी चालक अद्याप सापडला नसून त्याचा शोध सुरु आहे. आज (गुरुवारी) सायंकाळी सहा ते साडे सहाच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मांडवी पुलावर भरधाव रेन्ट कॅबने दुचाकीला ठोकरल्याने दुचाकी चालक पुलावरुन नदीत पडला. नदीत पडलेल्या दुचाकी चालकाचा शोध घेण्यासाठी बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाले असून, शोधकार्य सुरु आहे.

अपघातानंतर पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहन आणि बघ्यांची गर्दी गोळा झाली होती. यामुळे पुलावर काही काळासाठी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.

Mandovi Accident
Mandovi Accident

नदीत पडलेल्या दुचाकी चालकाचे बचाव आणि शोधकार्य सुरु असून, अद्याप बेपत्ता चालकाची माहिती मिळालेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT