Goa Crime News
Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: 'त्या' वकिलाकडून साडेचार लाखाचा ऐवज जप्त

गोमन्तक डिजिटल टीम

आल्तिनो-पणजी येथील न्यायालय इमारतीतील मुद्देमाल चोरीप्रकरणी संशयित मुझाहिद्दीन शेख याच्या वाळपई येथील कार्यालयातून 4 लाख 75 हजार 275 रुपयांची रोख रक्कम तसेच मुद्देमाल असलेली पाकिटे जप्त केली आहे. त्याने चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची माहिती अजून उघड केलेली नाही.

चोरलेल्या मुद्देमालाची माहिती देत नसून तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे त्यामुळे ती वाढवून घेतली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.

मुस्लिमवाडा - वाळपई येथील पेशाने वकील असलेल्या मुझाहिद्दीन शेख याचे वाळपई येथे कार्यालय आहे. चोरलेल्या मुद्देमालातील रोख रक्कम जाळल्याचे तसेच सोन्याचे दागिने नदीत फेकून दिल्याचे सांगून तो पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत आहे.

पोलिसांनी त्याच्या वाळपई येथील कार्यालयाची झडती घेतली असता तेथे रोख रक्कम तसेच मुद्देमालाची पाकिटे सापडली. कायद्याचे ज्ञान असल्याने तो मारहाण केल्यास पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाकडे तसेच मानवी या हक्क आयोगाकडे तक्रार करण्याची धमकी देत आहे, अशी माहिती सूत्राने दिली.

31 जानेवारी रात्री न्यायालय पुरो इमारतीच्या नझीर या खोलीतील विष मुद्देमालाची चोरी केल्यानंतर तो वाळपई तरी व येथील कार्यालयात गेला. त्या रात्रीच चे त्याने चोरलेल्या मुद्देमालाची पाकिटे राजा तो फाडली व त्यातील रक्कम गोळा केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT